situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Crime News : सराईत गुन्हेगार ‘आक्या बॉण्ड’सह २६ गुन्हेगार तडीपार

Published On:
Crime News

Team MyPuneCity – अल्पवयीन असताना १४ गंभीर गुन्हे, त्यानंतर दरोडा, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर कलमांखाली दोन गुन्हे दाखल असलेल्या चिखली मधील ( Crime News ) आकाश उर्फ सुमित उर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहळ (१९, चिखली) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याच्यासह चिखली मधील आठ, महाळुंगे एमआयडीसी मधील तीन, एमआयडीसी भोसरी मधील ११, दिघी मधील तीन तर चाकण मधील एक अशा एकूण २६ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये १८ जणांना दोन तर आठ जणांना एका वर्षासाठी तडीपार केले असून याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी दिले आहेत.

Pimpri Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेणाऱ्या आरोपीस अटक

परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील शरद ज्ञानेश्वर मोरे (२७, मुळशी) याला दोन वर्षांसाठी तर स्वयम सबाजी सावंत (२७), सोनू बहिरू केदारी (२९, खेड) या दोघांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. चिखली पोलीस ठाण्यातील संग्राम दत्तात्रय पवार (२९, चिखली), आक्या बॉण्ड, सुमित गणेश पिल्ले (३२), कनिष्काराज उर्फ राणा अरुण सुरवसे (२१, चिखली), कुणाल बाळकृष्ण भंडारी (२३, मोईगाव, खेड) यांना दोन तर तेजस निलेश गायकवाड (२०), रोहन शंकर पंडित (२३, चिखली) यांना पुणे जिल्ह्यातून आणि मारुती मांजरीया राठोड (४५, निगडी) याला एक वर्षासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून तडीपार केले आहे.

एमआयडीसी भोसरी येथील जीके उर्फ गणेश संतोष कोठावळे (१९, चिखली) याच्या टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. टोळीतील सदस्य ससा उर्फ प्रतीक कैलास गजरमल (१९, चिंचवड), रोहित राजू बजलव (चिखली), व्ही पी उर्फ विशाल हनुमंत पोळ (२१, चिखली), बच्चा उर्फ दिग्विजय अनंत गायकवाड (१९, चिंचवड) यांच्यावर कारवाई झाली आहे. या टोळीवर गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. केतन सोनवणे उर्फ चेप्या (२६, पिंपरी), सचिन बाळू धांडे (२०), दीपक गोरख धांडे (२४), राहुल भारत जाधव (२०) यांना दोन वर्षांसाठी तर विजय बाळासाहेब साळवे (२२, मोशी), ज्ञानेश्वर वसंत दुनघव (२२) यांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

दिघी पोलीस ठाण्यातील गजानन गोविंद भोसले (२८, लोहगाव, पुणे), जयंता हरिपद सरकार (२९, दिघी), अक्षय नंदू पठारे (२०, चऱ्होली), चाकण पोलीस ठाण्यातील आरोपी महिला नंदा रंगनाथ साळुंके (५०, चाकण) या आरोपींना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. नंदा साळुंके हिच्यावर गांजा विक्री प्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत.

जानेवारी ते मे या कालावधी मध्ये परिमंडळ तीन मधून ९१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. तसेच १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असल्याचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी ( Crime News ) सांगितले.

Follow Us On