- भाजपा आमदार महेश लांडगे यांची भावना
- मुख्यमंत्री सहायता निधीत 5 लाख रुपयांची मदत
Team My pune city – ‘‘महाराष्ट्र सेवक..’’ या समर्पित भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी व्हावा, असे आवाहन पक्षाने केले. त्याला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात महारक्तदान शिबीर होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण 8 ठिकाणी रक्तदान महाअभियान होणार आहे. सेवाभावी भूमिकेतून होणार हा वाढदिवस निश्चितच आदर्शवत आहे, अशी भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
Praful Lodha : प्रफुल्ल लोढावर बावधन पोलीस ठाण्यातही बलात्काराचा गुन्हा दाखल
राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनावश्यक खर्च टाळून “मुख्यमंत्री सहायता निधी” मध्ये योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या सामाजिक आणि विधायक उपक्रमाला प्रतिसाद देत 5 लाख रुपयांचा मदतनिधीचा धनादेश शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे सूपुर्द केला.यावेळी निखिल बोऱ्हाडे उपस्थित होते.
Nutan Kamble : मुख्याध्यापिका नूतन कांबळे-घोलप यांचे निधन
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात ‘महारक्तदान’ अभियान, आश्रमशाळांना मदत, दिव्यांग बांधवांसाठी उपक्रम, तसेच गोशाळांमध्ये चारा वाटप यांसारखे विविध विधायक उपक्रम सुरू आहेत. या माध्यमातून वाढदिवस सेवाभाव आणि सामाजिक समर्पण या भावनेतून साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा होणार असून गरजू आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात म्हणून उपयोगात येणार(CM Devendra Fadnavis) आहे.
**
राज्याच्या प्रगतीसाठी सेवाभावी आणि समर्पित भावनेतून काम करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील युवा पिढीचे आदर्श आहेत. त्यांचा वाढदिवसदेखील तसचा सेवाभावातून साजरा होतो आहे, याचा मला अभिमान वाटतो. सेवा हीच खरी शुभेच्छा आणि समर्पण हीच खरी ताकद आहे, हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार CM Devendra Fadnavis) आहेत.
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.