Team My Pune City –श्री कालभैरवनाथ उत्सव समिती, चिंचवडगाव, (Chinchwadgaon)चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज व श्रीमंत महासाधू मोरया गोसावी महाराज यांचे एकत्रित पालखी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भक्तीमय सोहळा रविवार, दिनांक २० जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजता मोरया हॉस्पिटल समोर, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, चिंचवडगाव येथे संपन्न होणार आहे.
तुकाराम महाराज पालखीच्या परतीच्या प्रवासातील चिंचवड येथील आगमन हे मोरया गोसावी महाराज यांच्या पालखीच्या भेटीसाठी होत असून, दोन थोर संतांच्या पालख्यांची ही भक्तिभावाने भरलेली ऐतिहासिक भेट भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या भक्तीमय प्रसंगाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
Pune: पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
या कार्यक्रमाची माहिती माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांनी दिली.