Team MyPuneCity –श्रीदत्त देवस्थान, सावेडी, अहिल्यानगर यांच्यावतीने चिंचवडगावातील काशीधाम मंगल कार्यालय येथे दिनांक १० आणि ११ मे २०२५ या कालावधीत धार्मिक ग्रंथप्रदर्शन आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Maval : डोंगरावर फिरायला गेलेल्या चौघांवर मधमाश्यांचा हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
शुक्रवारी सायंकाळी ७:०० वाजता श्री गुरुदेवांचे आगमन होईल. शनिवार, दिनांक १० मे रोजी सकाळी ठीक ०७:०० वाजेपासून नामस्मरण, आरती, सेवा सूचना, प्रसारकार्य हे धार्मिक उपक्रम राबविण्यात येतील.
याशिवाय स्व. श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी सुरू केलेल्या वेदांच्या प्रचारकार्याची माहिती देवस्थानचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन देणार आहेत. रविवार, दिनांक ११ मे रोजी दुपारी ०३:०० वाजता समारोप होईल. नागरिकांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी तसेच धार्मिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.