सामाजिक बांधिलकी जपत स्व. पनराज सोनिगरा (Sonigara Foundation) यांना स्मृतिदिनी आदरांजली अर्पण
Team My Pune City -स्व. पनराज पुखराज सोनिगरा फाउंडेशन (Sonigara Foundation) व अश्विन मेडिकल फाउंडेशनच्या मोरया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. पनराज पुखराज सोनिगरा स्मृतिदिन सोहळा मोठ्या श्रद्धेने व सामाजिक भान राखत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सत्यनारायण महापूजेने झाली. पाहुण्यांचं स्वागत तुळशीमाळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आलं. स्व. पनराज सोनिगरांच्या प्रतिमेचं पूजन, नवकार मंत्रजप व आरतीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साध्वीजी विनीतयशाश्रीजी महाराज साहेब व साध्वी निविकल्पाश्रीजी महाराज साहेब यांचा कांबळी अर्पण करून सन्मान करण्यात आला. साध्वीजींनी आपल्या आशीर्वचनात सांगितले की, सोनिगरा परिवाराच्या कार्यातून सामाजिक जाणीव प्रकट होते आणि मोरया हॉस्पिटलच्या इमारतीसाठी दिलेलं योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे.
Vinay Kumar Choubey: यंदाचा गणेशोत्सव लेजरमुक्त करा- विनयकुमार चौबे
फाउंडेशनच्या वतीने मोरया हॉस्पिटलच्या विस्तारित मजल्याच्या बांधकामासाठी १ कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. अध्यक्ष तेजस सोनिगरा यांनी आपल्या भाषणात आजोबांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, “आजोबांनी व्यवसायाबरोबरच सामाजिक मूल्यांचे धडेही दिले. त्यांच्या शिकवणीचा वारसा आम्ही सामाजिक कार्यातून पुढे नेत आहोत.”
Bali Pass Trek: हिमशिखरावरील स्वर्गीय अनुभूती देणारा बाली पास ट्रेक !!!

श्रुती सोनिगरा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी करताना संस्थेच्या आरोग्यसेवेविषयीची बांधिलकी स्पष्ट केली. आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरविंद पंडित यांनी केले.
या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक शेखर पंडित, जिल्हा संघचालक विनोद बन्सल, डॉ. रोकडे, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय कुलकर्णी यांचा समावेश होता.
सोनिगरा परिवारातील मोहिनीबेन सोनिगरा, दिलीप पनराज सोनिगरा, जितेंद्र पनराज सोनिगरा, प्रवीण पनराज सोनिगरा, अरविंद सोनिगरा, दर्शन सोनिगरा, करण सोनिगरा, तेजस दिलीप सोनिगरा, प्रवीण कांतिलाल पुनमिया व अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. मोरया हॉस्पिटलच्या वतीने या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय ॲड. अस्मिता वाचासुंदर, डॉ. मुकुंद डिग्गीकर, डॉ. प्रकाश बोराडे, डॉ. अक्षय वाचासुंदर, डॉ. अरविंद पंडित, भगवान तांदे, समीर पाटील, उदय यन्नेवार, सारिका मोरे, रक्षा देशपांडे यांच्यासह मोरया हॉस्पिटलचे डॉक्टर्स, कर्मचारी, ट्रस्ट सदस्य व अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.