Team My pune city – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र उद्योग नगर चिंचवड पुणे येथे भारतीय 79 व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून योगेश खंदारे एस के एफ इंडिया लिमिटेड जनरल जनरल मॅनेजर प्रीसेटिंग युनिट, मधू जोशी ज्येष्ठ विचारवंत, इसीए संस्थेचे सिकंदर घोडके, स्वानंद राजपाठक गुणवंत कामगार, शारदाताई मुंडे समाज प्रबोधनकार, या मान्यवरांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून पर्यावरणासाठी स्वच्छता अभियान व वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
SPM School : शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळेचा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
योगायोगाने 79 या संख्येने सर्व कामगार बंधू व कुटुंबीय उपस्थित राहिले. प्रमुख पाहुणे श्री.योगेश खंदारे यांनी आधुनिक भारताचा शिल्पकार हा प्रत्येक कामगारच आहे. येणाऱ्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक कामगाराने तंत्रशिक्षण आधुनिक पद्धतीने स्वीकार करून त्याचा आर्थिक व सर्वांगीण विकास या युगात कामगाराने करावा. अध्यक्षीय भाषणात मधु जोशी यांनी स्वातंत्र्य पूर्व भारत आणि आधुनिक जगातील तिसरी अर्थ महासत्ता असणारा भारत देशा यावर उत्तम विचार मांडले.

तसेच पन्नास वर्षांपूर्वी कामगार कल्याण मंडळ वरळी येथे झालेल्या एका समारंभाच्या कार्यक्रमाच्या आठवणी त्यांनी जागा केल्या. उत्तम उत्तम खेळाडू आणि साहित्यिक या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या व्यासपीठावरून व्यक्तिमत्व घडले. तसा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. कामगार कल्याण केंद्र आणि मंडळ उत्तमरीत्या उपक्रम व योजना राबवीत आहे याचे मन भरून कौतुक केले.
Vadgaon Maval : सामाजिक कार्यकर्ते अशोक घोजगे यांचे निधन
इसीए संस्थेचे श्री.सिकंदर घोडके यांनी पर्यायावरण विषयची उपयुक्त माहिती दिली. शारदाताई मुंडे समाज प्रबोधनकार यांनी भारत माता हीच आपली पहिली आई.. आणि स्त्री शक्ती याचा सन्मान करून तणाव ग्रस्त आयुष्यात आनंदाने सामोरे जावे हे प्रबोधन व भारुड रूपात सादर केले. श्री सुभाष चव्हाण यांनी अध्यात्म, पर्यावरण आणि आरोग्य हे तीन मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांच्या योगदानाविषयी अनुभव मांडले.
याप्रसंगी मान्यवर महाराष्ट्र कामगार भूषण मोहन गायकवाड, महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार सुभाष चव्हाण, सोमनाथ पतंगे, सुधाकर खुडे, प्रवीण वाघमारे अण्णा गुरव ,भरत शिंदे ,बळीराम शेवते, मच्छिंद्र कदम, सूर्यकांत बारसावडे, भाऊसाहेब गायकवाड, प्रकाश चव्हाण त्याचबरोबर ईसीए पर्यावरण संस्थेचे सर्व मान्यवर, कामगार बंधूभगिनी आणि कुटुंबीय यांची उपस्थिती राहिली. केंद्र संचालक श्री प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार श्री स्वानंद राजपाठक (गुणवंत कामगार, एस के एफ इंडिया लि) यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन अश्विनी दहीतुले, माया कदम, शंकर शेलार, भास्कर मुंडे, आणि सतीश चव्हाण यांनी केले.