Team MyPuneCity – दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सतरा वर्षीय युवतीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचारापूर्वीच मृत्यू (Chinchwad Murder) झाला. ही धक्कादायक घटना रविवारी (11 मे) रात्री नऊच्या सुमारास कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी 24 तासात दोघांना अटक केली. अटक केलेले आरोपी हे युवतीच्या शेजारी राहण्यास होते.
उदयभान बन्सी यादव (42, वाल्हेकरवाड़ी, चिंचवड), अभिषेक रणविजय यादव (21, वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. खून झालेल्या (Chinchwad Murder) युवतीचे नाव कोमल भारत जाधव (17, कृष्णाई कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आहे. याप्रकरणी युवतीचा मामा सचिन बिभीषण माने (39, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Crime News: कोयत्याने वार करत अल्पवयीन मुलाचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी आदिती हिने फोन करून कळवले की, कोमल दिदीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन चाकूने हल्ला केला असून ती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली आहे. त्यावरून फिर्यादी सचिन माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोमलला आपल्या वाहनातून ऑक्सीकेअर रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी कोमलला पाहून तातडीने वायसीएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, वायसीएम रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
SSC Result : दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार; निकालासाठी ९ अधिकृत संकेतस्थळांची सुविधा
दरम्यान, माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी (Chinchwad Murder) भेट देऊन तपास सुरू केला. सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करत आहेत. मृत कोमल ही कृष्णाई कॉलनी, चिंचवड येथे आपल्या आई व भावासोबत राहत होती. तिच्या वडिलांना दारूचे व्यसन असल्याने गेल्या काही वर्षांपासून तिची आई पतीपासून विभक्त राहत आहे.