Team My Pune City -कमला एज्युकेशन सोसायटीच्या,प्रतिभा ग्रुप ऑफ चिंचवडच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेज च्या वतीने सभागृहात अतिशय उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. बारावीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना आपल्या गुरुचरणी अर्पण केली.
याप्रसंगी अनेक माता, पालक उपस्थित होते त्या सर्वांचे मातृपूजन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले.
कार्यक्रमाचें अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा यांनी करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी आता आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम्स, व्हर्च्युअल शिक्षक यांच्या युगात आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि,तंत्रज्ञान माहिती देऊ शकते, पण “ज्ञान”, “अनुभव”, आणि “जीवनातील निर्णय” हे फक्त एक ‘मानवी गुरु’ च देऊ शकतो.म्हणून जीवनात गुरूला अतिशय महत्त्वाचे स्थान असते.
Nigdi: जैन संतांचा चातुर्मास प्रवेश, ‘धर्मवृष्टी’ उपक्रमाने शहरात आध्यात्मिक उत्साह
विद्यार्थीनी आसावरी बदडे हिच्या सरस्वती वंदना व गुरुवंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.तसेच ओवी शिखरे हिने गणेशवंदना नृत्यरूपाने सादर केली.
त्यानंतर संस्थेकडून गुरूंजणांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना वर्षभर नृत्य शिकवण्यासाठी संस्थेत रुजू झालेले नृत्य शिक्षक संकेत साकोरे व ओवी शिखरें यांची ओळख करून देण्यात आली.
Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी
हा कार्यक्रम प्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ अर्चना गांगड व सर्व शिक्षकांच्या सहाय्याने पार पडला.
या कार्यक्रमास संस्थेच्या खजिनदार डॉ भूपाली शहा,संस्थेच्या संचालिका डॉ. तेजल शहा,प्रतिभा ज्यूनिअर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे उपस्थित होत्या तसेच संस्थेचे हितेन करानी यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बारावीचे विद्यार्थीनी आस्था शहा,ईश्वरी शहा, स्वरा तापकीर व आभा ओझा यांनी केले तर अकरावीच्या