Team My Pune City – गणेश विसर्जन मिरवणूक सुरू(Chinchwad) असताना डीजे विजेच्या खांबाला धडकला. त्यामुळे विजेच्या तारा तुटल्या आणि मिरवणुकीतील दोन कार्यकर्त्यांच्या अंगावर पडल्या. यामध्ये विजेचा शॉक लागल्याने दोघे गंभीर जखमी झाले.
प्रवीण राजेंद्र कुटे (21, रामनगर दत्तनगर, चिंचवड), अमोल सदाशिव चव्हाण (39, क्रांतीनगर, आकुर्डी) अशी जखमींची नावे आहेत.
शुक्रवारी (5 सप्टेंबर) रात्री मोहननगर, चिंचवड येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती. रात्री दहा वाजताच्या सुमारास मिरवणूक काली माता मंदिर जवळ पोहोचली. त्यावेळी मिरवणुकीचा डीजे रस्त्याच्या बाजूला असलेल्या विजेच्या खांबाला धडकला. यामुळे खांबावरील विजेच्या तारा तुटल्या. या तारा प्रवीण आणि अमोल यांच्या अंगावर पडल्या. तारांमध्ये विद्युत प्रवाह सुरू होता. तारा अंगावर पडल्याने शॉक लागून प्रवीण आणि अमोल हे गंभीर जखमी झाले. त्यांना चिंचवड मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Pune Ganpati Visarjan 2025: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात व ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींना भावूक निरोप
Bhaje Maval: श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे गणेशोत्सव मंडळाचा आकर्षक देखावा
महावितरणच्या भोसरी उपविभागाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. महावितरण कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित करून तारा बाजूला केल्या. या घटनेमुळे मोहननगर मधील काही भाग शुक्रवारी रात्री बराच वेळ अंधारात होता.