Team MyPuneCity – चिंचवडमधील वाल्हेकरवाडी ( Chinchwad )परिसरात बुधवारी (२५ जून) रात्रीच्या वेळी पाच जणांच्या टोळक्याने व्हिडीओ शूट करत वाहनांची तोडफोड केली. तर काही वाहने पेटवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Aashadhi Wari Sohala : माऊलींच्या पादुकांचे नीरा नदीत शाही स्नान
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे अडीचच्या सुमारास एक टोळके वाल्हेकरवाडी परिसरात आले. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा करत पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या, दुचाकी खाली फेकून दिल्या. टेम्पो, चारचाकी आणि रिक्षा टार्गेट करून नुकसान केले. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ शूट करतच ही तोडफोड करण्यात ( Chinchwad)आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
Vadgaon Maval : पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून चिंचवड पोलिसांच्या ढिसाळपणावर टीका केली आहे. घटनेनंतर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू ( Chinchwad) आहे.