Team My Pune City – पूर्वीच्या वादातून रुपीनगरमध्ये एका तरुणाला दगड, विटा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 3) सकाळी सात ते नऊ वाजताच्या दरम्यान घडली.
महिला आरोपी, दाजी प्रमोद ढेपे, स्वप्नील प्रमोद ढेपे (वय 25), प्रथमेश प्रमोद ढेपे (वय 19 ), यश प्रमोद ढेपे व त्याचे 4 ते 5 साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.कपिल गुणवंत मस्के (वय 35, रा. भिगीरथी सोसायटी, रुपीनगर) यांनी शुक्रवारी (दि. 4) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Uddhav Thackeray :एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच- उद्धव ठाकरे
Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ अनिल यांच्याशी वाद झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. चाकू घेऊन गेलेल्या अनिलला प्रत्युत्तरादाखल आरोपींनी डोक्यात दगडविटा मारून गंभीर जखमी केले. आरोपींनी फिर्यादीचा मोबाइल हिसकावून त्यांनाही मारहाण केली. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.