Team My pune city – देशाच्या फौजदारी कायद्यांमध्ये झालेल्या बदलांच्या अनुषंगाने, भारतीय न्याय संहिता (बीएनएस), भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (बीएसए) या तीन नव्या कायद्यांवर एक अभ्यासपूर्ण कार्यशाळा चिखली पोलीस ठाण्यात ( Chikhali Police Station) आयोजित संपन्न झाली.
या कार्यशाळेत पोलीस अधिकाऱ्यांना या कायद्यांची सखोल माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेत कायदेतज्ज्ञ ॲड. मंगेश खराबे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बीएनएस, बीएनएसएस, आणि बीएसए या कायद्यांमधील मूलभूत बदल, त्यांचे पोलीस अधिकाऱ्यांवरील परिणाम, आणि अंमलबजावणी करताना घ्यावयाची दक्षता याबाबत अनेक उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले.
Ladki Bahin Yojana : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता
नव्या कायद्यांची प्रमुख वैशिष्ट्ये
भारतीय न्याय संहिता (बीएनएस): यामध्ये जुन्या आयपीसी कायद्याच्या तुलनेत गुन्ह्यांचे वर्गीकरण पुन्हा करण्यात आले आहे. मोबाईल आणि सायबर ( Chikhali Police Station) गुन्ह्यांसाठी स्वतंत्र तरतुदी, महिला व बालकांवरील अत्याचारांसाठी कडक शिक्षा, आणि कायद्यातील पळवाटा कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता (बीएनएसएस): जुन्या ( Chikhali Police Station) सीआरपीसी कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. यामध्ये झिरो एफआयआर, ई-एफआयआर, डिजिटल अटक प्रक्रिया आणि तपास अधिक प्रभावी बनवणाऱ्या तरतुदींचा समावेश आहे. अटक व जामिनासाठी स्पष्ट नियम व प्रक्रिया निश्चित करण्यात आल्या आहेत.
भारतीय साक्ष्य अधिनियम (बीएसए): 1872 च्या जुन्या कायद्याचे हे आधुनिक रूप आहे. यात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुराव्यांना कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज, ईमेल आणि टेक्स्ट मेसेजेस हे पुरावा म्हणून स्वीकारले जातील. तसेच, साक्षीदारांच्या संरक्षणासाठी नवीन तरतूद करण्यात आली आहे.
Kalapini : कलापिनी आयोजित मनाचे श्लोक पांठातर स्पर्धा उत्साहात संपन्न
या कार्यशाळेला चिखली पोलीस ठाण्यातील ( Chikhali Police Station) 50 हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामातील अडचणी आणि शंकांबाबत प्रश्न विचारले. ॲड. खराबे यांनी त्यांचे समाधानकारक निरसन केले. वरिष्ठ निरीक्षक साळुंखे यांनी या कार्यशाळेचा उद्देश, पोलीस अधिकाऱ्यांना नव्या कायद्यांची व्यावहारिक समज देणे आणि तंत्रस्नेही, नागरिककेंद्रित पोलीस प्रशासन तयार करणे हा असल्याचे सांगितले. भविष्यात अशाच प्रकारच्या अधिक सखोल कार्यशाळा आयोजित करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.