Team MyPuneCity – दुकानात चोरी करत असल्याच्या संशयावरून एका तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी (7 जून) पहाटे चिखली (Chikhali Crime News) येथे घडली.
अब्रार बसीर अहमद (23, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी इर्शाद बशीर अहमद (26) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार नबी हसन साह उर्फ सैफुद्दीन (26), मोहम्मद सैफ शेख (28, चिखली) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Mahalunge Crime News : मारहाण करत कामगारांना लुटणाऱ्या तिघांवर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्रार अहमद हा चौधरी स्क्रॅप गोडाऊन येथे एका गाळ्यात झोपला होता. पहाटेच्या वेळी आरोपी तिथे आले. त्यांनी अब्रार याला लोखंडी पाईप आणि लाकडाने मारहाण केली. आमच्या दुकानांमध्ये सारखा चोरी करतो याला जिवंत सोडायचे नाही, असे म्हणत आरोपींनी अब्रार याला ठार मारण्याचा प्रयत्न (Chikhali Crime News) केला.