मावळ ऑनलाईन –मित्रांसोबत खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा (Chikhali)मृत्यू झाला. मंगळवारी (९ सप्टेंबर) रोजी दुपारी चिखली येथील शेलार वस्तीमधील खाणीतील पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला.
श्री मनोज चव्हाण (१७, तळवडे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
Pune Ganeshotsav : पुण्यात साडे सहा लाख गणेशमूर्तींचे विसर्जन; 876 टन निर्माल्य संकलन, मात्र मूर्ती दानात घट
MLA Sunil Shelke : टाकवे बु., फळणे, बेलज परिसरात आमदार सुनील शेळके यांचा “जनसंवाद” अभियान दौरा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री हा सोमवारी दुपारी चार वाजता मित्रांसोबत चिखली येथील शेलार वस्तीमधील खाणीत पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी घाबरून तेथून निघून गेले. मात्र, त्यांनी याबाबत कोणालाही सांगितले नाही. दरम्यान, मनोज याचा शोध सुरू केला असता, मंगळवारी सकाळी मित्रांनी घटनेबाबत सांगितले. त्यावेळी चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दुपारी दीड वाजताच्या सुमारास मनोज चव्हाण याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.