situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chichwad : चापेकर- सावरकरांच्या पदरी उपेक्षा आणि अपमान – चारुदत्त आफळे

Published On:
Chichwad

शत्रुघ्न काटे, सार्थक फडके यांचा निगडीत सत्कार

Team MyPuneCity – राष्ट्रहितासाठी आपल्या कुटुंबाचे स्मशान करणारे, प्रखर राष्ट्र योद्धे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतिवीर चापेकर जीवन जगले. त्यांच्यावर अशोभनीय व यातनामय जीवन जगण्याची वेळ आली.स्वातंत्र्यानंतर हि त्यांच्या पदरी अपमान आणि उपेक्षाच आली. परकीय संस्कृतीचे आक्रमण आपल्या संस्कृतीवर होण्या आधीच ऐतिहासिक, क्रांतिकारी महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीला संस्कारातून शिकवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्तबुवा आफळे यांनी ( Chichwad) केले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, पिं-चिं शाखा आणि भाजप उद्योग आघाडी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सप्ताह समारोप निमित्त चापेकर- सावरकर” या विषयावर कीर्तनाचे आयोजन करण्यात ( Chichwad)आले होते.

यावेळी आमदार अमित गोरखे, हभप किसन महाराज चौधरी, माजी उप महापौर शैलेजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, शिवसेनेच्या सरिताताई साने, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, नंदा ताकवणे, भारती फरांदे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक अतुल इनामदार, शलाका इनामदार आदी मान्यवर उपस्थित ( Chichwad) होते.

Pimpri Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेणाऱ्या आरोपीस अटक

यावेळी”अनादी मी! अनंत मी!!” नाटकातील सर्वोत्कृष्ट बाल सावरकरांची भूमिका साकारणारा बाल नाट्य कलाकार सार्थक फडके याला बाल सावरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शत्रुघ्न काटे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

सावरकरांचा धगधगता इतिहास मांडताना आफळे बुवा पुढे म्हणाले की, सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, चापेकर यांच्या कडून प्रेरणा घेऊन, जाईल त्या ठिकाणी त्यांनी आपल्यासारख्याच बहाद्दूर क्रांतिकारकांची फळी तयार केली. आज शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, क्रांतिवीर चापेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्गाने देश यशस्वी वाटचाल करीत आहे. यातूनच भविष्यात समतेचा, ममतेचा, मानवतेचा हिंदुराष्ट्र निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

एखाद्या महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांना त्वरित शिक्षा जाहीर करून प्रकरणे त्वरित निकाली काढले पाहिजेत, जेणेकरून असे बौद्धिक आक्रमण होणार नाही. बदनामीचे प्रकरण निकाली काढण्यापेक्षा विलंब लावणे हाच अन्याय आहे, अशा शब्दांत न्यायालयालयीन कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

कीर्तन आणि व्याख्याने या समाज प्रबोधनाची परंपरा पुढे सुरु ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे ( Chichwad) सांगितले.

यावेळी स्वातंत्र्यवीर संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चापेकर यांना त्वरित भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, तसेच निगडी मेट्रो स्टेशनला सावरकरांचे तर चिंचवड मेट्रो स्टेशनला चापेकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली.

शत्रुघ्न काटे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर संस्थेचे अध्यक्ष कुलकर्णी यांनी केलेल्या मागणीचा आदर करून स्वा. सावरकर आणि क्रांतिवीर चापेकरांचे नाव निगडी आणि चिंचवड मेट्रो स्टेशन दिले जाईल, असे आश्वासन दिले.

ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर हेही ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुश्री सोहोनी यांनी तर आभार शलाका इनामदार ( Chichwad) यांनी मानले.

Follow Us On