Team MyPuneCity – “एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी…” — काही महिन्यांपूर्वी ज्योतिबा मंदिरात बोललेले छगन भुजबळ यांचे हे शब्द आज अक्षरशः खरे ठरले. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वळणं घेत, संघर्षांचा सामना करत अखेर भुजबळ (Chhagan Bhujbal) पुन्हा एकदा मंत्रिमंडळात ऐटीत विराजमान होणार आहेत. आज, मंगळवार २० मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता ते मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवण्यात येणार असून, हे खाते यापूर्वी धनंजय मुंडे यांच्या अखत्यारीत होते.
मंत्रिपदाचा ‘एक ओळीचा’ आमंत्रण मेसेज!
मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना शपथविधीसाठी फक्त एका ओळीचा मेसेज पाठवण्यात आला होता. ही एक ओळ होती – “उद्या सकाळी १० वाजता राजभवनात शपथविधी.” इतक्या साध्या आमंत्रणातूनच राजकीय संधीचं मोठं दार भुजबळांसमोर पुन्हा उघडलं गेलं.
Pune: हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात अटक
या घटनेमागे नेमकं काय घडलं, कोणत्या चर्चांमधून हा निर्णय झाला, याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरु झाली असून त्याचाच एक भाग म्हणून भुजबळांची पुनर्प्रवेश घटना घडली.
अनुभव, जनाधार आणि ‘मराठा’ वळण
सार्वजनिक जीवनात चार दशके कार्यरत असलेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी व प्रगल्भ नेतृत्व आहे. ओबीसी समाजाचा त्यांना मोठा आधार असून, अलीकडच्या मराठा आरक्षण संदर्भात त्यांनी व्यक्त केलेली स्पष्ट मतं व त्यातून तयार झालेली चर्चा यामुळेही त्यांचं वजन वाढले होते.
राजकीय पक्षांतर्गत मंथन, सामाजिक समीकरणे, आणि सध्याच्या सरकारवर असलेला दबाव या सगळ्याच पार्श्वभूमीवर भुजबळांना पुन्हा मंत्रिपद देऊन सत्ताधाऱ्यांनी एक मजबूत आणि रणनीतीने विचार केलेलं पाऊल उचलल्याचे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
भुजबळांचा आजवरचा प्रवास : संघर्ष, कष्ट आणि सन्मान
छगन भुजबळ यांचा (Chhagan Bhujbal) राजकीय प्रवास हा संघर्षशील, पण तितकाच प्रेरणादायी राहिला आहे. शिवसेनेतून सुरुवात करून, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीचं नेतृत्व करत त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रीपदं भूषवली आहेत. त्यांच्यावर अनेक वेळा आरोप झाले, तुरुंगवास झाला, पण प्रत्येकवेळी ते नव्या जोमाने उभे राहिले.
मंत्रिपद मिळाल्यानंतर, भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फक्त एवढंच म्हटलं — “ही जबाबदारी आहे. अन्न व नागरी पुरवठा हे जनतेच्या रोजच्या जीवनाशी निगडित खाते आहे. मी पूर्ण ताकदीने कामाला लागणार आहे.”