Team My pune city –श्री वाघेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय.चऱ्होली बुद्रुक, येथील कला शिक्षक युवराज लक्ष्मण शेलार यांनी आषाढी एकादशी निमित्त फलक लेखन द्वारे काळ्या फळ्यावर रंगीत खडूच्या सहाय्याने आकर्षक असे पालखी सोहळ्याचे, विठुरायाचे चित्र काढले आहे.यामध्ये ज्ञानेश्वरांची पालखी रथ सोहळा,वारकरी मानवी मनोरा ,वारकऱ्यांने वारी करताना मुलाला कडेवर घेतलेले चित्र तसेच विठ्ठल ,मंदिर ,नदी व विठ्ठल नाम लिहिले आहे.
पुंडलिके बरवे केले | केसे भक्तीने गोविले|| नामा म्हणे नीट| पायी जडलीसे वीट||
असे त्यास शीर्षक दिले आहे.
Nigdi: शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेचा वर्धापन दिन सप्ताह सांगता समारंभ उत्साहात साजरा
Maval: मावळातील रिक्षा चालकाचा मुलगा झाला सीए
या फलक लेखनाचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे. व त्याचे कौतुक होत आहे.आर्टिस्ट युवराज शेलार सोशल मीडिया पेज वर त्यांचे फलक लेखनाचे तसेच पेन्सिल स्केच आहेत.
श्री वाघेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय.चऱ्होली बुद्रुक,येथे कलाशिक्षक म्हणून ते आहेत .अशी माहिती शेलार यांनी दिली.
