Team My Pune City –डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या(Chandrakant Patil) आवाहनाला प्रतिसाद देत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिजिटल पत्रकारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील डिजिटल मीडियासाठी ही एक ऐतिहासिक सुरुवात ठरली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी डिजिटल मीडियामध्ये कार्यरत पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी शैक्षणिक, वैद्यकीय आणि क्रीडा मदतीचे आवाहन केले होते. त्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आर्थिक मदत केली आहे. ही मदत बार्शी येथील ‘रियल न्यू’चे संपादक हर्षद लोहार यांना करण्यात आली. हर्षद लोहार यांची मेंदूच्या दुर्धर आजाराने त्रस्त असल्याने नुकतीच शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यांच्या उपचारांसाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज होती. या पार्श्वभूमीवर, राजा माने यांनी मंत्री महोदयांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. ही मदत डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी आश्वासक आधार ठरतोय. राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून अशी सकारात्मक पावले उचलली गेल्यास, डिजिटल पत्रकारितेला नवे बळ मिळेल अशी आशा राज्यातील डिजिटल पत्रकारांमधून व्यक्त केली जात आहे.
Amit Gorkhe: स्थानिक प्रश्नांसह राज्यस्तरीय प्रश्न सभागृहात मांडले – अमित गोरखे
यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी हर्षद लोहार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना आधार दिला. “हर्षद लवकर बरे होऊन पुन्हा सक्रिय होतील” असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. हर्षद लोहार यांच्या मातोश्री श्रीमती वैशाली अशोक लोहार यांनी चंद्रकांत दादा पाटील साहेब, व राजा माने साहेबांचे आभार मानत पुढेही सहकार्य राहावं अशी भावनिक इच्छा व्यक्त केली.
Sangeeta Bijlani: अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या फार्महाऊसमध्ये चोरी

याप्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य संघटक तेजस राऊत, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष सूर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, बार्शी तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, पत्रकार गणेश भोळे, अक्षय बारुंगुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.