Team My Pune City – चाकणसह परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीवर(Chakan traffic jam) कायमस्वरूपी उपाय म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) कठोर निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून या भागातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर थेट निष्कासनाची कारवाई करण्यात येणार असून, पुन्हा अतिक्रमणे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पीएमआरडीएने दिला आहे.
AyurHealth Council : व्हिएतनाममध्ये होणार दुसरी आंतरराष्ट्रीय आयुरहेल्थ परिषद ; आयुष विभाग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक( MUHS) चे सहकार्य
गेल्या काही वर्षांत चाकण औद्योगिक क्षेत्रात उद्योग, व्यापार आणि लोकसंख्या(Chakan traffic jam) झपाट्याने वाढल्याने वाहतूक कोंडी गंभीर स्वरूप धारण करत आहे. मोठ्या वाहनांच्या लांबलचक रांगा, अरुंद रस्ते आणि रस्त्यावर झालेले अतिक्रमण यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाने अतिक्रमणांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी यापूर्वीच संबंधितांना स्वखर्चाने अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे काढून टाकण्याचे आवाहन केले होते. मात्र, अनेकांनी त्याकडे (Chakan traffic jam) दुर्लक्ष केल्याने प्रशासनाने थेट कारवाईचा निर्णय घेतला आहे. आगामी आठवड्यात प्रस्तावित रस्ते रुंदीकरणानुसार जमिनीवर मार्किंग करण्यात येणार असून, त्यानंतर बांधकामे व अतिक्रमणे हटवली जाणार आहेत.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी समांतर रस्त्यांचे जाळे उभारणे, अरुंद रस्ते रुंद करणे, तसेच पुणे-नाशिक रस्ता, तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता व नवीन प्रस्तावित रस्त्यांवरील बंद नाले खुले करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचेही डॉ. म्हसे यांनी(Chakan traffic jam) सांगितले.
“प्रशासनाने काढलेली अतिक्रमणे पुन्हा केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल. नागरिकांनी आणि बांधकाम व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन डॉ. म्हसे यांनी केले.
या निर्णयामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील (Chakan traffic jam) वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.