Team MyPuneCity –चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील वाहन चोरीचा गुन्हा उघड करण्यात युनिट ३ च्या पथकाला यश आले आहे. सहा लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार पोलिसांनी हस्तगत केली आहे.
दिनांक 11 जुलै 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने वाहन चोरास अटक केली आहे. सदर पथकास मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने या गुन्ह्यातील चोरीस गेलेली स्विफ्ट कार नंबर एम एच 14 एल बी 6845 ही अरोपी ऋषिकेश गणपत जाधव वय 32 वर्ष रा. समृद्धी कॉलनी, गोडबोले वस्ती, केशव नगर, मुंडवा , हडपसर याच्या कडून हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे.
Traffic congestion: तळेगाव-चाकण मार्गावरील वाहतूक कोंडी चिंताजनक; मावळमित्र समितीकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Alandi:अपहरण करून वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व संस्था तत्काळ बंदची मागणी
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल जावळे, पोलीस हवालदार आढारी, मोरे, लोणकर, कोळेकर यांनी केली आहे.