Team MyPuneCity – चाकण औद्योगिक भागात नाणेकरवाडी हद्दीत चाकण पोलिसांनी सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतले . त्याच्याकडे तब्बल एक किलो 78 ग्रॅम वजनाचा 60 हजार 500 रुपयांचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आला आहे.
चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भैरोबा यादव यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून आकाश सिंग अजय प्रताप सिंग ठाकूर वय 26 सध्या रा. निघोजे , मूळ रा. मध्य प्रदेश याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
Pimpri Chinchwad Crime News 1 June 2025: पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला
चाकण पोलीस ठाण्याचे भैरोबा यादव यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पंचांचा समक्ष सदर ठिकाणी सापळा रचून ही कारवाई केली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.