चाकण आंबेठाण रस्त्यावरील स्थानिक गावकरी एकवटले
Team My Pune City – चाकण आंबेठाण रस्त्यावर अतिक्रमण कारवाई( Chakan News) करण्यात येणार आहे. या भागात रस्त्याच्या मध्यापासून साडेबारा मीटरवर खुणा केल्यानंतर आता संबंधित नागरिकांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे या भागातील कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी चाकण पालिकेवर गुरुवारी (दि. ११ ) भव्य मोर्चा काढला होता. चाकण आंबेठाण रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबवा, जमिनी ताब्यात घेताना पहिल्यांदा मोबदला द्या… अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.
चाकण आंबेठाण या प्रमुख जिल्हा मार्गावर अन्य भागातून अवजड वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे पहिल्यांदा अवजड वाहतूक थांबवा आणि नंतर स्थानिकांच्या सहमतीने गरजेएवढ्या रस्त्याचे योग्य मोबदला देऊन भूसंपादन करा अशी स्थानिकांनी मागणी आहे. या बाबत प्रशासनाला स्थानिकांनी कळवल्यानंतर देखील प्रशासन प्रतिसाद देत नसल्याचा आरोप करत चाकण आंबेठाण रस्त्यावरील नागरिकांनी गुरुवारी चाकण मधील झीत्राईमळा ते चाकण पालिका असा भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले.


Maval : मावळ पर्यटन तालुका घोषित होणार
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, माजी नगराध्यक्षा मंगल गोरे,( Chakan News) नगरसेवक महेश शेवकरी, प्रवीण गोरे, निलेश गोरे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद गायकवाड, बाजार समितीचे संचालक राम गोरे, सामाजिक कार्यकर्ते संजय गोरे, मुबीन काझी, शोभा शेवकरी आदींनी संतप्त भावना व्यक्त करत सदरची कारवाई अन्यायकारकरीत्या होऊ देणार नसल्याची ठाम भूमिका मांडली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना निवेदन देण्यात ( Chakan News) आले. यावेळी राजगुरुनगर बँकेचे माजी अध्यक्ष अशोक भुजबळ, कुमार गोरे, अमृत शेवकरी , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम गोरे ,दतात्रेय गोरे, भरत गोरे, नवनाथ शेवकरी, बिपीन रासकर, प्रकाश भुजबळ , कॉंग्रेसचे निलेश कड आदींसह स्थानिक नागरिक , सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चाकण पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
नऊ मीटर कारवाई करण्यास संमती :
चाकण आंबेठाण रस्त्यावर रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना साडेबारा मीटरवर खुणा करण्यात आल्या आहेत. मात्र खेडचे आमदार बाबाजी काळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी यांच्यासमवेत पीएमआरडीएच्या प्रमुख अधिकार्यांशी संपर्क करण्यात आला आहे. या भागात साडेबारा मीटर एवजी नऊ मीटर कारवाई बाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे यावेळी नितीन गोरे यांनी बोलताना सांगितले. योग्य मोबदल देऊन नऊ मीटर कारवाई करण्यास संमती असल्याचे यावेळी आंदोलकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून जाहीर ( Chakan News) केले.