Team My Pune City -इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर ४ महिने फोनवर बोलणे झाले. (Chakan)त्यानंतर एका ३१ वर्षीय पोलिसाने २५ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणी संबंधित पोलिसावर चाकण पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दत्ता भाऊराव कुंभारे ( वय 31 वर्ष रा. नवरंगपूर ता. कंधार जि. नांदेड ) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
या बाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार२५ वर्षीय विवाहिता आणि पोलीस दत्ता कुंभारे यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली. ते दोघे चार महिन्यांपर्यंत एकमेकांशी फोनवर बोलत होते . संबंधित विवाहितेच्या पतीला सदरची घटना कळल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीचा मोबाईल नंबर बदलून टाकला. त्यानंतर पतीने आपल्या पत्नीला नवीन नंबर घेऊन दिला.
संबंधित विवाहितेने आरोपी पोलिसास फोनवरून सांगितले ‘तुझं माझं मागे जे काही झालं ते सोडून दे, मी कॉल रेकॉर्ड डिलीट कर’ .. पिडीतेने पोलिसास सांगितले. आरोपी पोलीस कुंभारे याने संबंधित विवाहितेला दमबाजी केली. तू तुझा नंबर बदललास किंवा माझा नंबर ब्लॉक केला तर तुझे रेकॉर्डिंग तुझ्या नवऱ्याला पाठवतो अशी धमकी दिली. त्यानंतर संबंधित विवाहितेच्या घरी येऊन विवाहिता घरात स्वयंपाक करत असताना अत्यंत अश्लील कृत्य केले. त्यानंतर त्याने संबंधित विवाहीतेशी तिच्याच घरात शिरून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
PMC : प्रारूप प्रभागरचनेवर पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 380 हरकती, हरकतीत सीमारेषेत झालेल्या बदलांबाबत आक्षेप
Majha Bappa Gharoghari: ऑनलाईन बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
यावरून चाकण पोलिसांनी सरकारी नोकरीत असलेला पोलीस दत्ता भाऊराव कुंभारे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या चाकण येथे राहावयास असलेली व मुळची लातूर येथील असलेली पंचवीस विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दिली आहे.