Team MyPuneCity – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड (Chakan Market) मध्ये कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली. बटाट्याची आवक वाढून दरात किंचित घसरण झाली.
वाटाणा, कारली, हिरवी मिरची व रताळ्याचे भाव तेजीत राहिले. चाकण बाजारात पालेभाज्यांची आवक घटल्याने भावात मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल ३ कोटी १० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात (Chakan Market) कांद्याची एकूण आवक १,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १,५०० क्विंटलने घटून कांद्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,४०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १५० क्विंटलने वाढल्याने भावात १०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक २८ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १७ क्विंटलने घटूनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.
Pune: सध्याच्या परिस्थितीत भारत देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु – प्रदीप रावत
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३४५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक (Chakan Market) व बाजारभाव पुढीलप्रमाणे
- कांदा – एकूण आवक – १,००० क्विंटल. भाव क्रमांक – १. १,४०० रुपये, भाव क्रमांक २. १,१०० रुपये, भाव क्रमांक ३. ८०० रुपये.
बटाटा – एकूण आवक – १,४०० क्विंटल.भाव क्रमांक १.२,००० रुपये, भाव क्रमांक २.१,६०० रुपये,भाव क्रमांक ३.१,२०० रुपये.
फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात (Chakan Market) एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे – टोमॅटो – ३३० क्विंटल (१,००० ते २,००० रू.),कोबी – २१० क्विंटल ८०० ते १,२०० रू.), फ्लॉवर – २३० क्विंटल (१,४०० ते २,००० रु.), वांगी – ९४ क्विंटल (२,५०० ते ३,५०० रु.), भेंडी – ७४ क्विंटल (३,५०० ते ४,५०० रु.),दोडका – ६४ क्विंटल (४,००० ते ७,००० रु.),कारली – ७६ क्विंटल ( ३,५०० ते ४,५०० रु.),दुधीभोपळा – ७३ क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.),काकडी – १२० ( क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.),फरशी – २५ क्विंटल (१,१०० ते १,३०० रु.),वालवड – १६ क्विंटल (७,००० ते ८,००० रुपये), ढोबळी मिरची – ११६ क्विंटल (५,००० ते ७,००० रु.), चवळी – ४४ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), शेवगा – ४६ क्विंटल (५,००० ते ७,००० रु.), गाजर – १७१ क्विंटल (१,००० ते २,००० रु.), गवार – ६८ क्विंटल (५,००० ते ७,०००), वाटाणा – ३० क्विंटल (१०,००० ते १२,०००).
पालेभाज्या –
चाकण येथील बाजारात (Chakan Market) पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण ६ हजार ५०० जुड्या (२,५०० ते ३,००० रुपये ), कोथिंबीर – एकूण २४ हजार २०० जुड्या (२,००० ते २,८०० रुपये,), शेपू – एकूण ३ हजार १०० जुड्या (१,००० ते १,५०० रुपये ), पालक – एकूण ३ हजार २५० जुड्या (१,००० ते १,८०० रुपये),.
जनावरे –