Team My pune city – चाकण येथील महामार्ग दिवसभर वाहतुकीने कोंडीत अडकलेला असतो. सकाळ-संध्याकाळ एवढी वाहतूक कोंडी ( Chakan Highway ) असते की काही कामासाठी बाहेर पडावे कि पडू नये ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत असतो.
पुणे- नाशिक महामार्ग चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी, नागरिक, कामगार, व्यावसायिक, उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. पुणे नाशिक महामार्ग आणि चाकण तळेगाव रस्ता मंगळवारी ८ जुलै रोजी दिवसभर असा वाहतूक कोंडीत अडकला होता. प्रवाशांनी या मार्गावर अडकून पडावे लागत असल्याचे सांगत संताप ( Chakan Highway ) व्यक्त केला.
रस्त्यावर खड्डे; वाहनांच्या लांबचलांब रांगा
चाकण मधील माणिक चौक ते मुटकेवाडी चौक दरम्यान काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यातच येथील उड्डाण पुला जवळील खड्ड्यात मंगळवारी सकाळी एक लहान मालवाहू वाहन अडकून पडल्याने या भागात वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला असल्याचे स्थानिक कार्यकर्ते अनिल फुलवरे, बाळासाहेब वडवे यांनी कळवले ( Chakan Highway ) आहे.