इंडस्ट्री फेडरेशन आणि वीज वितरण कंपन्यांच्या बैठकीत आश्वासनांचा पाऊस
Team MyPuneCity – चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये हजारो (Chakan Electricity Problem) उद्योग आहेत. इथे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. महावितरण आणि महाट्रान्स्को या कंपन्यांकडून औद्योगिक वसाहतीमध्ये वीजपुरवठा केला जातो. वीज वितरण कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि ढिसाळ नियोजन यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये सतत विजेच्या समस्या उद्भवत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी शुक्रवारी (१६ मे) झालेल्या बैठकीत कंपन्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन वीज वितरण कंपन्यांकडून देण्यात आले.
बैठकीसाठी महावितरणचे विभागीय संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे, सुपरीटेड इंजिनिअर युवराज जरग, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे अध्यक्ष शिवहरी हालन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल, विनोद जैन, अल्फा फोम कंपनीचे एमडी राजीव रांका, अगरवाल पॅकेजिंगचे संचालक मनोज बंसल, डेक्सेल प्लास्ट कंपनीचे एमडी अनिल बजाज, शिंडलर कंपनीचे अमोल शिरगुप्पे, विजय नायर, मर्सिडीज बेंज कंपनीचे सारंग जोशी त्याचबरोबर(Chakan Electricity Problem) इतर 90 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल यांनी कंपन्यांचे विजे संबंधित प्रश्न मांडले. त्यावेळी ते म्हणाले, महावितरणसाठी चाकण परिसर अत्यंत महत्त्वाचा व संवेदनशील आहे. कारण या परिसरातून फार मोठ्या प्रमाणावर महावितरण व सरकारला रेव्हेन्यू दिला जातो. त्याचबरोबर जगातील बहुतांश देशांच्या कंपन्या या परिसरात काम करत आहेत. त्यामुळे या परिसरातील विजेचे प्रश्न तात्काळ सोडविणे अत्यंत गरजेचे आहे. मागील काही दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावर पावर फेल्युअर, पॉवरची डीप येणे, फ्लॅक्च्युएशन अशा समस्या उद्योगांना भेडसावत आहेत. त्या सोडविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतरही या समस्या सुटलेल्या नसल्याचे बटवाल यांनी सांगितले.
विजेच्या समस्यांमुळे कंपन्यांची प्रॉडक्शन कॉस्ट वाढत आहे. मेंटेनन्स वाढत आहे. वीज वितरण कंपन्यांकडून न कळवता अचानक देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा दिवसभर बंद केला जातो. उत्पादित मालाच्या सप्लाय चेनवर याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान होते. वीज पुरवठा कंपन्यांना काही कंपन्यांनी स्वचिंग स्टेशनसाठी जागा दिल्या आहेत. तरी देखील कंपन्यांची विजेच्या समस्यांतून सुटका झालेली (Chakan Electricity Problem) नाही.
PMRDA : पीएमआरडीए जाहीर करणार लागवडीसाठी २३६ वृक्षांची यादी
यावर महावितरणचे विभागीय संचालक भुजंग खंदारे म्हणाले, कंपन्या आणि महावितरण यांच्यात समन्वय राखून निर्णय घेतले जातील. सर्व समस्या एका दिवस सोडवणे शक्य नाही. मात्र एका एका फिडरवरील समस्या सोडवू. कंपन्यांनी त्यांच्या समस्या लेखी स्वरूपात दिल्यास त्यावर काम करणे सोयीस्कर होईल. माझ्या कार्यकाळात सर्व समस्या सोडविणार, असे आश्वासन देखील खंदारे यांनी दिले.
महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे म्हणाले, विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज सोबत दर तीन महिन्यांनी बैठक घेतली जाईल. त्यामध्ये मागील तीन महिन्यात केलेल्या कामाचा आढावा घेतला जाईल. कंपन्यांसोबत संवाद ठेऊन देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ दोन दिवस अगोदर कंपन्यांना कळवली (Chakan Electricity Problem) जाईल.