Team My pune city – खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव (Chakan Crime News) येथे सोमवारी ( दि. १४ जुलै ) मध्यरात्री सशत्र दरोडा पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरातील ७५ ग्राम वजनाचे तब्बल ५ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत.
Wanwadi Crime News : निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात घुसून 59 लाख रुपयांचा ऐवज लंपास मंगळवारी रात्री उशिरा शेलपिंपळगाव ( मोहितेवाडी ) येथील या दरोड्यां प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 25 वर्षे विवाहितेने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. सोमवारी 14 जुलै रोजी रात्री अकरा वाजता मोहितेवाडी येथील संबंधितांच्या घरातील सर्वजण घराची आतील कडी लावून झोपी गेले. मध्यरात्री संबंधित विवाहितेला अचानक जाग आली. त्यावेळेला दोन इसम बेडरूममध्ये असणाऱ्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यामध्ये शोधाशोध करताना उभे होते. दरवाजवळ एक जण उभा होता.
त्यांना पाहताच विवाहिता जोरजोरात ओरडू लागली. त्यानंतर त्यांनी विवाहितेचे तोंड हाताने दाबले व हिंदी भाषेतून सांगितले चूप राहो… हमारे पेट का सवाल है… हम कुछ नही करेंगे पैसा और सोना किधर रखा है बताओ… घर मे कोन कोन रहता है ? दरोडेखोरानी दिलेल्या धमकीने विवाहिता शांत झाली. घरामध्ये सासू-सासरे आहेत असे सांगून पैसे सोने सगळे कपाटामध्येच आहेत … तुम्हाला जे न्यायचे ते घेऊन जा .. असे विवाहितेने त्यांना (Chakan Crime News) सांगितले.
Rashi Bhavishya 16 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
त्यानंतर विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र , कानातील टॉप्स काढून घेतले. तसेच कपाटांमधील सर्व कपडे कागदपत्रे साहित्य बाहेर काढले. त्यावेळी कपाटामध्ये असणारा सोन्याचा छोटा डबा त्यांनी घेतला त्याचबरोबर गुलाबी रंगाची मोठी पर्स घेतली. त्यात पर्समध्ये पाचशे रुपयांच्या नोटा , पॅन कार्ड, आधार कार्ड कागदपत्रे होते. दरम्यान लहान मुलाचे पैंजण काढत असताना तो रडू लागल्याने तिघेजण पळून गेले. पळून जाताना त्यांनी विवाहितेच्या उशीजवळ असलेला अॅपल कंपनीचा मोबाईल सोबत नेला.
ते तिघेजण बाहेर गेल्यानंतर बेडरूमला बाहेरून कडी लावली . तिघांनी काळ्या रंगाचे कपडे घातले होते. एकाच्या हातात लोखंडी पाईप होता . कपाटाजवळ असणाऱ्या इसमाकडे बॅटरी होती. तिघेही मध्यम बांध्याचे व 30 ते 35 वर्षे वयाचे होते, दरोडेखोर गेल्यानंतर विवाहितेने जोरजोरात ओरडून सासू-सासर्यांना आवाज दिला . त्यानंतर गावातील लोकही जमा झाले. या घटनेमध्ये सोन्याचे टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन ,रोकड मोबाईल असा पाच लाखाहून अधिक किमतीचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. चाकण पोलीस अधिक तपास करत (Chakan Crime News) आहेत.