Team My Pune City – महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी शिंदे ( ता.खेड ) गावच्या हद्दीत कंपनीत चोरी केलेल्या आरोपींचा तांत्रिक पद्धती( Chakan Crime News) ने शोध घेतला असून याप्रकरणी तिघांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीचा माल व २ मालवाहू वाहने असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उस्मान उर्फ बिलाल उर्फ अब्दुलहरेरा सहा ( वय 25 वर्ष सध्या रा. भांबोली ता. खेड , मूळ रा. नवगड, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश ) बालचंद राम केशव मोर्या ( वय 31 सध्या रा. कुदळवाडी चिखली , मूळ रा. सिद्धार्थ नगर उत्तर प्रदेश ) आणि मोहम्मद इम्तियाज अजीज चौधरी ( वय 39 सध्या रा. पवार वस्ती कुदळवाडी, चिखली, मूळ रा. सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश )( Chakan Crime News) या तिघांना अटक करण्यात आली आहे . अटक केलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल तसेच केबल वायर सोलून काढलेले चौदाशे किलो वजनाचे कॉपर व गुन्ह्यात वापरलेली दोन मालवाहू वाहने जप्त करण्यात आली आहे.
Marathi Sahitya Sanmmelan : 99व्या संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी – उदय सामंत
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी 72 तासांमध्ये कंपनीतील ( Chakan Crime News) चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री अडीच ते पहाटे 4 च्या दरम्यान चाकण एमआयडीसी मधील शिंदे गावाच्या हद्दीतील मिरॅकल केबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून आत प्रवेश करून 35 लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे केबल वायर बंडल व इतर साहित्य लांपास केले होते .
याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला होता . दरम्यान महाळुंगे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे काही गुन्हेगारांचा( Chakan Crime News) छडा लावला. त्यामध्ये उस्मान सहा , स्वराज्य शांताराम कालापाड ,इम्तियाज सहा यांनी कंपनीमधून माल चोरला व भालचंद राम किशोर मोर्या आणि मोहम्मद इम्तियाज अजीज चौधरी यांना विकला असल्याचे निष्पन्न झाले .
Marathi Sahitya Sanmmelan : 99व्या संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी – उदय सामंत
चोरी करणारे व चोरीचा माल विकत घेणारे आणि मालाची वाहतूक करणारे अशा सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे . अटक आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल व केबल वायर सोलून काढलेले चौदाशे किलो वजनाचे कॉपर ( प्लास्टिकच्या आवरणासह ) तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन मालवाहू वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी , गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे व त्यांच्या पथकाने ( Chakan Crime News) केली आहे.