situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chakan Crime News : व्यावसायिक भागीदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 18 June 2025
---Advertisement---

पोलिसांचा खबरीलाल निघाला मास्टर माईंड

Team MyPuneCity – व्यावसायिक भागीदाराला अमली पदार्थ विक्रीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न चाकण पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांना खबरी देणारा खबरीलालच या गुन्ह्यात मास्टर माईंड निघाला आहे. पोलिसांनी खबरीलाल आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. वसीम हनीफ शेख असे खबरीलालचे नाव आहे. त्याच्यासह निखिल मारुती कड आणि राहुल बाळासाहेब टोपे यांना अटक करण्यात (Chakan Crime News) आली आहे.

Pimpri- Chinchwad Crime News 15 May 2025 : महिलेला बोलण्यात गुंतवून मंगळसूत्र पळवले

पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी चाकण पोलिसांना त्यांच्या खबरी मार्फत माहिती मिळाली कि, चाकण येथील चाकण ग्रँड हॉटेल जवळ एका कार मध्ये मेफेड्रोन (एमडी) हे अमली पदार्थ आहेत. कार मधील व्यक्ती एमडी विक्रीसाठी आला आहे. त्यानुसार पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये एमडी हा अमली पदार्थ आढळून आला. कार चालक तुषार मलीभाऊ कड (मेदनकरवाडी, खेड) याला अटक करण्यात आली.

तुषार कड याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत असताना तुषार कड याने सांगितलेली माहिती आणि गुन्ह्याची पद्धत यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे तुषार कड याला कोणीतरी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे (Chakan Crime News) तपास सुरु केला.

Maval Crime News : बांधकाम करू नका म्हटल्याने तिघांना मारहाण

तुषार कड, निखिल कड, राहुल टोपे हे एकाच गावात राहत असून तिघेजण जमीन खरेदी करून प्लॉटिंग करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. व्यवसायात आर्थिक कारणावरून तुषार यांचे निखिल आणि राहुल यांच्यासोबत भांडण झाले. त्याचा बदला घेण्यासाठी तसेच व्यवहारातील सर्व जमीन आपल्याला मिळावी या उद्देशाने निखिल कड आणि राहुल टोपे यांनी त्यांचा मित्र हनीफ मुजावर (वडगाव पीर, आंबेगाव) आणि पोलिसांचा खबरी वसीम शेख (घोरपडी पुणे) यांच्यासोबत मिळून तुषार कड याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला.

त्यानुसार तुषार याच्या कार मध्ये एमडी हे अमली पदार्थ ठेवण्यात आले. वसीम शेख याने चाकण पोलिसांना चुकीची माहिती दिली. चाकण पोलिसांनी हा कट उघडकीस आणला असून निखिल कड, राहुल टोपे, वसीम शेख या तिघांना अटक केली (Chakan Crime News) आहे.

Follow Us On