situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chakan Crime News: सराईत चोराकडून 8.25 लाखांच्या 15 चोरीच्या मोटारसायकली जप्त, 16 गुन्ह्यांची उकल

Published On:
Chakan Crime News

Team Pune City – चाकण औद्योगिक परिसरात वाढलेल्या (Chakan Crime News)मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी चाकण पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने राबविलेल्या विशेष मोहिमेत एक मोठी कारवाई उघडकीस आली आहे. या कारवाईत सराईत चोर अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याच्याकडून तब्बल 8 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 15 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, एकूण 16 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.

चाकण पोलीस ठाणे हद्दीत (Chakan Crime News)अज्ञात चोरांकडून सातत्याने मोटारसायकल चोरी होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती. याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपआयुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांना तपासाची सूचना दिली होती.

Talegaon Dabhade: गोकुळाष्टमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

PCMC:पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत शंकर आण्णा गावडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन….

वपोनि संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रसन्न जराड, सपोनि गणपत धायगुडे यांच्या पथकाने घटनास्थळांची पाहणी करून 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेज तपासली. तपासादरम्यान काही फुटेजमध्ये आरोपी अशोक सोनवणे हा चोरी करताना दिसला. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला एका चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून तांत्रिक तपास आणि चौकशी केल्यानंतर विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण 15 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

या कारवाईत चाकण पोलीस ठाण्यातील 14 वडगाव मावळ आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 अशा मिळून एकूण 16 गुन्ह्यांची उकल झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, सपोनि प्रसन्न जराड, सहायक पोलिस निरीक्षक गणपत धायगुडे, तसेच पोलीस अंमलदार सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, राहुल सुर्यवंशी, सुनिल भागवत, महादेव बिक्कड, रेवनाथ खेडकर, महेश कोळी, शिवाजी लोखंडे, अमोल माटे, राजु जाधव, भैरोबा यादव, रुषीकुमार झनकर, सुदर्शन बर्डे, विकास तारु यांच्या संयुक्त पथकाने केली.

Follow Us On