चाकणकरांचा अधिकाऱ्यांच्या समोर समस्यांचा पाढा
Team MyPuneCity – चाकण औद्योगिक भागात राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक कोंडीचे चित्र दररोज हमखास पहावयास मिळत ( Chakan ) आहे. पुणे नाशिक महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर दरम्यान आणि औद्योगिक भाग व चाकण आंबेठाण रस्त्यावर वाहतुकीला कोंडीचा ब्रेक मागील अनेक वर्ष लागत आला आहे. चाकणकर यामुळे त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर चाकण मध्ये स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालयात प्रशासनातील सर्व अधिकारी व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी आयोजित केली होती.
Pune :युवतीला त्रास देणाऱ्या रोडरोमीयोला अटक
चाकण वाहतूक कोंडीच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस चाकण नगरपरिषदेचे मुख्यअधिकारी डॉ.अंकुश जाधव, चाकण वाहतूक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राज गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाग्यश्री गिरी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अशपाक आलम, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष मृण्मय काळे , आदींसह चाकणचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नितीन गोरे यांनी सांगितले, द्रुतगती महामार्ग, एलीव्हेटेड महामार्गाची कामे सुरु व्हायची तेंव्हा होतील मात्र तो पर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रयत्न ( Chakan ) करावेत.
Pavana Dam : पवना धरण ६३ टक्के भरले; मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात तब्बल तिपटीने वाढ
चाकण मधील सम विषम पार्किंगची अंमलबजावणी करण्यापूर्वी वाहनतळ उभारण्याची मागणी करण्यात आली. कोंडीची समस्या सोडवण्यासाठी विविध उपाय योजना करण्याच्या सूचना माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, नगरसेवक निलेश गोरे, प्रवीण गोरे, महेश शेवकरी, रोनक गोरे यांच्यासह युवा सेनेचे तालुकाप्रमुख मृण्मय बाबाजी काळे, प्रिया नारायणराव पवार, सामाजिक कार्यकर्ते बिपीन रासकर, प्रतिक जाधव, शशिकांत कड, प्रशांत टोपे आदींनी यावेळी केल्या.
महामार्गांची कामे होई पर्यंत उपाययोजनांची मागणी
पुणे-नाशिक महामार्गाचे नियोजित नवीन काम चालू होई पर्यंत तळेगावचौक ते आंबेठाणचौक पर्यंत मोकळ्या केलेल्या साईड पट्ट्यांवर त्वरित डांबरीकरण करून रस्ता वापरत आणण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच सेवा रस्त्यावर साठत असलेल्या सांडपाण्याची व्यवस्था करून जागोजागी पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत. चाकण शिक्रापूर रोडवरील माणिक चौकात शिक्रापूर कडून येणारी वाहतूक पूर्वीप्रमाणे सरळ तळेगाव चौक येथून सोडावी. तसेच मुटके वाडी येथील पुणे नाशिक महामार्गावरील दुभाजक पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली.
झेब्रा क्रोसिंगची मागणी
माणिक चौक, तळेगाव चौक, आंबेठाणचौक व आळंदीफाटा येथे चौकापासून कमीत कमी दहा मीटर अंतरावर झेब्रा क्रॉसिंग करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे सिग्नल मोडणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे जाईल तसेच पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडणे देखील सोयीस्कर होईल अशी मागणी या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिकार्यांकडे ( Chakan ) केली.
आंबेठाण रस्त्यावर अवजड वाहनांवर नियंत्रण
चाकण-आंबेठाण रोडवरील जड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मार्गावर सकाळी ७ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा हातभार लागेल अशी भूमिका नितीन )गोरे यांच्यासह पदाधिकार्यांनी ( Chakan ) मांडली.