एकूण उलाढाल ३ कोटी ७० लाख रुपये
Team My Pune City –खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रताळ्यांची मोठी आवक झाली. कर्नाटक राज्यातून १०० टन रताळ्यांची आवक झाली. एकादशीनिमित्त रताळ्याला मोठी मागणी होती. घाऊक बाजारात रताळ्यास प्रतिकिलोला २० ते ३० तर किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये बाजारभाव मिळाला.
चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक होऊन भाज्यांचे भाव स्थिर राहिले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक व भावही स्थिर राहिली. एकूण उलाढाल ३ कोटी ७० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक निम्म्याने घटूनही भावात दोनशे रुपयांची घट झाली आहे. कांद्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून १,८०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ७०० क्विंटलने घटून कमाल भाव २,२०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. लसणाचा कमाल भावही १० हजार रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ४०५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ५ हजार रुपयांपासून ते ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे
कांदा – एकूण आवक – ५०० क्विंटल.भाव क्रमांक – १.१,८०० रुपये, भाव क्रमांक २.१,५०० रुपये, भाव क्रमांक ३.१,२०० रुपये.
बटाटा – एकूण आवक – १,२५० क्विंटल.भाव क्रमांक १.२,२०० रुपये, भाव क्रमांक २.१,७०० रुपये,भाव क्रमांक ३.१,५०० रुपये.
फळभाज्या –
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – २९० क्विंटल (१,००० ते १,८०० रू.),कोबी – २५० क्विंटल १,००० ते १,५०० रू.),फ्लॉवर – १८० क्विंटल (२,००० ते ३,००० रु.), वांगी – ८१ क्विंटल (५,००० ते ६,००० रु.),भेंडी – ५८ क्विंटल (४,००० ते ६,००० रु.), दोडका – ४८ क्विंटल (४,००० ते ५,००० रु.),कारली – ६४ क्विंटल ( ४,००० ते ६,००० रु.),दुधीभोपळा – ५४ क्विंटल (२,००० ते ३,००० रु.),काकडी – १०० ( क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.),फरशी – १० क्विंटल (८,००० ते १०,००० रु.),वालवड – २६ क्विंटल (७,००० ते ९,००० रुपये), ढोबळी मिरची – १०० क्विंटल (४,००० ते ६,००० रु.),चवळी – २६ क्विंटल (३,५०० ते ४,५०० रु.),शेवगा – ३८ क्विंटल (६,००० ते ८,००० रु.), गाजर – १८० क्विंटल (२,५०० ते ३,५०० रु.), गवार – ४४ क्विंटल (६,००० ते ९,००० रु. ), आले – १८० क्विंटल ( २,००० ते ३,००० रु. ), रताळी – २७५ क्विंटल ( २,५०० ते ३,५०० रु.).
Dehu:देहूत तुकोबांच्या दर्शनासाठी भर पावसात भाविकांची गर्दी
पालेभाज्या –
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण ९ हजार जुड्या (७०० ते १,२०० रुपये ), कोथिंबीर – एकूण २२ हजार ४०० जुड्या (८०० ते १,४०० रुपये,), शेपू – एकूण ३ हजार ५०० जुड्या (१,००० ते १,३०० रुपये ), पालक – एकूण ३ हजार २५० जुड्या (८०० ते १,२०० रुपये),.
Alandi :देवशयनी आषाढी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी
जनावरे –