Team My Pune City -चाकण नगर परिषद हद्दीत आंबेठाण रस्त्यावर शुक्रवारी (दि. 23) (Chakan)सकाळी २ ते ३ तासात पिसाळलेल्या कुत्र्याने थैमान घालत तब्बल १२ जणांना चावा घेतला.
या हल्ल्यात एक शिक्षिका व एक तीन वर्षांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्र्याच्या विद्यार्थी, लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि कामगार असे १२ जण जखमी झाले आहेत.
सकाळी अवघ्या २ ते ३ तासांत संपूर्ण चाकण आंबेठाण रस्त्यावर दहशत माजवणार्या या कुत्र्याला पकडण्यासाठी चाकण पालिकेकडे काहीही व्यवस्था नसल्याने स्थानिकांनी वनविभागाच्या मदतीने या पिसाळलेल्या श्वानाला पकडले आहे.
PMC : प्रारूप प्रभागरचनेवर पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 380 हरकती, हरकतीत सीमारेषेत झालेल्या बदलांबाबत आक्षेप
Majha Bappa Gharoghari: ऑनलाईन बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद! घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
सकाळी एका शिक्षिकेला चावा घेतल्यानंतर कुत्र्याने थेट रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना जखमी केले.
त्यानंतर या परिसरात झित्राईमळा रोड, आंबेठाण रोड, बाळकृष्ण नगर ते भामा पेट्रोलियम पर्यंतच्या भागातही हल्ले सुरूच ठेवत नागरिकांना जखमी केले. या घटनेने परिसरात सकाळी प्रचंड घबराट पसरली होती. १० जखमींवर चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले , तर महिला व लहान मुलाची प्रकृती चिंताजन असल्याने त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले कि, पिंपरी चिंचवड येथून रेस्क्यू करणारे पथक बोलावण्यात आल्याने हा पिसाळलेला कुत्रा जेरबंद करण्यात यश आले.