अन्य बातम्या
Adkar Foundation : पंढरीच्या वारीमुळे मराठी भाषा टिकून – डॉ. सदानंद मोरे
आडकर फौंडेशनतर्फे ‘विठ्ठलवारी आनंद वारी’ पुस्तकाचे प्रकाशन Team My pune city –पंढरीची वारी ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. संतांच्या (Adkar Foundation)मराठी भाषेचा प्रचार होण्यासह ती टिकविण्याचे कार्य वारीच्या माध्यमातून होत आहे. या वारीची अलौकिक परंपरा, सत्यता, महती वाचकांपर्यंत पोहोचविण्यास ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ या ग्रंथाचा दस्तावेजासारखा उपयोग होणार आहे, असे गौरवोद्गार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले. Alandi : शनी अमावस्येनिमित्त शनी मंदिरात भाविकांची गर्दी आडकर फौंडेशनतर्फे बबनराव पाटील लिखित ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ या पुस्तकाचा (Adkar Foundation) प्रकाशन सोहळा आज (दि. २३ ऑगस्ट) नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झाला. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिखर बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. डॉ. मोरे पुढे म्हणाले, वाचकांच्या आजच्या काळातील अपेक्षेनुसार बदलत्या तंत्रज्ञानाला अनुसरून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकात अनेक अभ्यासक, विचारवंताचे लेख, उत्तम छायाचित्रे, दृकश्राव्यमाध्यमाचा चपखल वापर केल्याने वारीचे समग्र दर्शन घडणार आहे. हे पुस्तक वारीविषयी सर्वांगिण माहिती देणारे असल्याने वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. तंत्रज्ञानाची कास धरत संपूर्ण वारीचे समग्र दर्शन घडविणारी ही पहिलीची निर्मिती असल्याने हे पुस्तक निर्मितीक्षेत्रातही वस्तुपाठ ठरणार आहे. श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती : विद्याधर अनास्कर विद्याधर अनास्कर म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून पंढरीच्या वारीचा प्रसादरूपी ठेवा वाचकांपर्यंत आला आहे. विठ्ठल हा वारकऱ्यांचा देव, कष्टकऱ्यांचा आधार आहे. त्याच्या वारीतून निर्माण होणाऱ्या श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती या पुस्तकातून उलगडली आहे. हे नुसते पुस्तक नसून लेखकाच्या साधनेचा कृतीतून साकारलेला सत्य आणि सौंदर्यांचा मिलाफ आहे. (Adkar Foundation) विद्याधर अनास्कर म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून पंढरीच्या वारीचा प्रसादरूपी ठेवा वाचकांपर्यंत आला आहे. विठ्ठल हा वारकऱ्यांचा देव, कष्टकऱ्यांचा आधार आहे. त्याच्या वारीतून निर्माण होणाऱ्या श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती या पुस्तकातून उलगडली आहे. हे नुसते पुस्तक नसून लेखकाच्या साधनेचा कृतीतून साकारलेला सत्य आणि सौंदर्यांचा मिलाफ आहे. ...
Pune: स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत इंदिरा अत्रे बालसाहित्यकार पुरस्कारांची घोषणा
डॉ. शंतनू अभ्यंकर (मरणोत्तर), राजू तांबे, चंद्रशेखर जोशी, फारुक काझी व चंद्रमोहन कुलकर्णी, वर्षा चौगुले, संजीवनी बोकील पुरस्काराचे मानकरी ‘शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी’, ‘डेंजरस झिरो ग्राउंड प्लेट’, ‘कहाणी ‘वंदे मातरम्’ची’, ‘गंमत ...
Mockdrill : आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मॉकड्रील
Team My pune city – गणेशोत्सव आणि आगामी सण ( Mockdrill) उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. २१) सकाळी सांगवी येथील मोकळ्या मैदानात जमावबंदी ...
Rotary District : रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण दवणे यांची निवड
Team My pune city – रोटरी डिस्ट्रिक्ट ( Rotary District) 3131 मराठी साहित्य संमेलनाचे यंदा डिसेंबरमध्ये आयोजन करण्यात येणार असून संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, गीतकार प्रा. प्रवीण दवणे ...
Bhor News : रस्त्याअभावी जखमी वृद्धाला तीन किमी हातगाड्यावरून वाहून नेण्याची वेळ; भोर येथील घटना
Team My Pune City – भोर तालुक्यातील बोपे ( Bhor News) गावाच्या वाघमाची वस्तीतील रहिवाशांना अजूनही पायाभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. याच ...
Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन
Team My pune city – बॉलिवूडसह मराठी चित्रपटामध्ये ( Achyut Potdar)आपला ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या ९१ वर्षी निधन झालं आहे. ...
Pune News : मुस्लिम बँकेच्या अध्यक्षपदी तन्वीर इनामदार, उपाध्यक्षपदी एड.आयुब शेख
Team My pune city –दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी तन्वीर पी. इनामदार यांची ,उपाध्यक्षपदी ऍड. आयुब शेख ( Pune News) यांची बिनविरोध निवड ...
Pimpri News : शैल नाईक याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Team My pune city – श्री शिवाजी उदय मंडळचा खेळाडू शैल ( Pimpri News) अजित नाईक याची राष्ट्रीय खुल्या योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
Alandi : स्वराज ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ; २३१ रक्तदात्यांचा सहभाग
Team My pune city – या वर्षी भारत १५ ऑगस्ट रोजी आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.स्वातंत्र्यदिना निमित्ताने स्वराज्य ग्रूप तर्फे ज्ञानदर्शन धर्मशाळा, ...
Pimpri News : पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Team My pune city – पिंपरी चिंचवड विज्ञान केंद्रात ( Pimpri News) स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ...