situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bullock cart racing : तळेगावच्या जत्रेत बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार!

Published On:
Bullock Cart Racing
---Advertisement---

मावळ ऑनलाईन -तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक (Bullock cart racing)उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत गावकींच्या बैलगाड्या सह एकूण ३०० बैलगाडे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. एकूण दोन दिवस या बैलगाडा शर्यती चालल्या असे उत्सव कमिटीचे अध्यक्ष अविष्कार भेगडे यांनी सांगितले.

मावळ तालुक्यात सर्वात मोठा उत्सव तळेगाव दाभाडेचा असून या उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, बैलगाडा शर्यती व कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या बैलगाडा शर्यतीत मावळ तालुक्याबरोबरच खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, हवेली, मुळशी आणि पुरंदर तालुक्यातील ३०० बैलगाडा स्पर्धक मालकांनी सहभाग घेतला होता.

Talegaon Accident : किराणा माल आणायला गेला अन् अपघातात जीव गमावला

▪️. दिवस पहिला फायनलमध्ये आलेले बैलगाडे

Ramnavami Amrit Mahotsav : श्रीराम नवमीनिमित्त रामवाडी येथे अखंड हरीनाम सप्ताह

▪️१ नंबर फायनल: टू व्हीलर
भेगडे आमदार बैलगाडा संघटना/स्वप्निल भोंडवे जुगलबंदी आणि हिंदकेसरी मोरा ग्रुप यांना विभागून

▪️२ नंबर फायनल: टू व्हीलर
प्रकाश मामा धावडे बैलगाडा संघटना आणि पांडुरंग गराडे/दशरथ गराडे यांना विभागून
▪️३ नंबर फायनल: एलसीडी
शांताराम कदम सभापती/भोंडवे जुगलबंदी

▪️४ नंबर फायनल: कुलर
शामभाऊ दाभाडे/त्रिशाताई दाभाडे जुगलबंदी

▪️ दिवस दुसरा फायनलमध्ये आलेले बैलगाडे

▪️१ नंबर फायनल-टू व्हीलर
नंदकुमार कुटे/गणेशशेठ म्हस्के जुगलबंदी आणि काळभैरवनाथ बैलगाडा संघटना यांना विभागून
▪️२ नंबर फायनल-टू व्हीलर
शिवतेज स्वप्निल आप्पा काळोखे आणि राजवर्धन प्रशांत शेठ भागवत यांना विभागून
▪️३ नंबर फायनल- एलसीडी
सहादूमामा आरडे/गणेश कल्हाटकर जुगलबंदी
▪️४ नंबर फायनल-कुलर
चैतन्य दीपक बोराटे

Crime News: अपघातानंतर धमकी देऊन गाडीच्या चाव्या काढून घेणे पडले महागात

या बैलगाडा शर्यतीत या घाटात १२ सेकंदात २८ बैलगाडा धावले, १३ सेकंदात १०६ बैलगाडा धावले, १४ सेकंदात ७० बैलगाडे धावले,१५ सेकंदात ६१ बैलगाडे पळाले. तर या स्पर्धेत पहिल्या दिवशी फळीफोडचा बहुमान अजित सुरेश ओव्हाळ यांच्या बैलगाड्यास मिळाला आणि दुसऱ्या दिवशीचा फळीफोडचा बहुमान गावडे/बोराटे या जुगलबंदीस मिळाला. तसेच पहिल्या दिवसाचा घाटाचा राजाचा मान दत्तात्रय शेटे/तुषार डावखर या जुगलबंदीस मिळाला तर दुसऱ्या दिवसाच्या घाटाचा राजाचा मान नंदकुमार कुटे/ गणेशशेठ म्हस्के या जुगलबंदीस प्राप्त झाला. दोन्ही दिवसातील अत्यंत आकर्षक बारी पद्मावती बैलगाडा संघटना (पारवडी) यांची झाली. तर गावातील सर्वात आतून आलेली बारी विलासशेठ काळोखे यांची आली.

या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी सुमारे ३५ ते ४० हजार शौकिनांनी हजेरी लावलेली होती. या घाटाचे नियोजन उत्सव समिती अध्यक्ष अविष्कार भेगडे,कार्याध्यक्ष प्रणव दाभाडे, खजिनदार शुभम लांडे, सरचिटणीस अजय पवार, प्रसिद्धी प्रमुख अभिषेक बुट्टे व श्री डोळसनाथ महाराज मंदिर नवनिर्माण समितीचे सदस्य, ग्रामस्थ यांनी केले होते.

Follow Us On