ब्राह्मण बिझनेस कॉन्क्लेव्ह कमिटीचा सर्व राजकीय पक्षांना संतुलित प्रतिनिधित्वाबाबत प्रश्न
Team My Pune City – आगामी महानगरपालिका (Brahmin community) आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण बिझनेस कॉन्क्लेव्ह कमिटीने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांना संतुलित प्रतिनिधित्वाबाबत प्रश्न विचारले आहेत. कमिटीचे सदस्य डॉ. सचिन बोधनी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध समाजांना उमेदवारीची संधी दिली जात असताना प्रामाणिकता, बुद्धिमत्ता आणि समाजनिष्ठा यांसाठी ओळखला जाणारा ब्राह्मण समाज मागे राहू नये.
Chandrika Pujari : चंद्रिकाच्या कामगिरीमुळे झोपडपट्टीतील मुलांना नवी प्रेरणा- राहुल डंबाळे
त्यांनी स्पष्ट केले की ही मागणी जातीयतेची नसून(Brahmin community) गुणवत्ताधारित आणि लोकशाहीसाठी आवश्यक आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये सक्षम, अभ्यासू आणि समाजसेवेसाठी तत्पर असलेले अनेक ब्राह्मण कार्यकर्ते आहेत. त्यांना उमेदवारी देणे लोकशाहीसाठी हितकारक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
कमिटीने विचारले आहे की “संतुलित प्रतिनिधित्व” या संकल्पनेत सर्व समाजांचा सहभाग अपेक्षित असताना ब्राह्मण समाजाला त्यातून वगळणे न्याय्य (Brahmin community) ठरेल का? तसेच सक्षम ब्राह्मण उमेदवारांना संधी दिल्यास त्या पक्षाला सर्व समाजाचा पाठिंबा मिळू शकतो, हे वास्तव नाकारता येणार नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले.
निवेदनाच्या शेवटी कमिटीने पुन्हा एकदा स्पष्ट केले की ही मागणी जातीयतेची नसून संतुलित आणि नैतिक प्रतिनिधित्वाची आहे. ब्राह्मण समाजाचे प्रश्न, विचार आणि मुद्दे सभागृहात पोहोचण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये ब्राह्मण समाजालादेखील योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली (Brahmin community) आहे.


















