Team MyPuneCity – मावळ तालुक्यातील ब्राम्हणोली गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकऱ्याच्या कुटुंबावर रात्रीच्या सुमारास जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी ५ ते ६ अनोळखी इसमांचा शोध सुरू आहे.
फिर्यादी नवनाथ शिवाजी काळे (वय ४२, व्यवसाय – शेती, रा. ब्राम्हणोली, पोस्ट – पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ मे रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरासमोरच्या ओसरीवर घडली.
फिर्यादी यांचे वडील शिवाजी बाबू काळे ओसरीवर झोपलेले असताना, आरोपी तन्मय मुकुंद काळे, वेदांत दिलीप काळे, वसंत कॉडू काळे, गणेश वसंत काळे (सर्व रा. ब्राम्हणोली), व त्यांच्यासोबत आलेले ५ ते ६ अनोळखी इसम यांनी मिळून जुन्या वादातून बेकायदेशीरपणे जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी केली. त्यांनी वडिलांच्या उशाजवळ असलेला फॅन आपटून नुकसान केले तसेच फिर्यादी, त्यांचे वडील आणि मुलगी तेजस्वीनी यांना हाताने मारहाण करून किरकोळ दुखापत केली.
Confrontation with Pakistan : ISI अस्तित्वात असेपर्यंत भारत-पाकिस्तान संघर्ष अटळ – अरविंद व्यं. गोखले
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.