Team MyPuneCity -नातेवाईक महिलेची वारंवार छेडछाड करत असल्याच्या कारणावरून तिघांनी तरूणाच्या डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून खून केला. ही घटना बोपखेल येथील गणेशनगरमध्ये सोमवारी (१६ जून) सायंकाळी सव्वापाच ते साडेसहाच्या दरम्या ( Bopkhel Murder) न घडली.
Alandi : भाविकांकडून माऊलींच्या पालखी व द्वाराकरिता चांदी अर्पण
याप्रकरणी दोन जणांना दिघी पोलीसांनी अटक केली असून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. विकास राजेश खरे (२४, बोपखेल) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. रोहन अरुण गायकवाड (२१), माम्या उर्फ प्रतीक दौलत मोहोड (२७, दोघे रा. बोपखेल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या १५ वर्षीय साथीदाराला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. निरज राजेश खरे (२७) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ( Bopkhel Murder) आहे.
Shirgaon Crime News : शिरगाव येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन गायकवाड याच्या नातेवाईक महिलेची मयत विकास हा वारंवार छेडछाड करत असे. याचा रोहनला राग होता. सोमवारी सायंकाळी गणेशनगर गल्ली क्रमांक १३ येथील लष्कराच्या सिमाभिंतीलगत आरोपी आणि मयत विकास हे दारू पित बसले होते. यावेळी झालेल्या वादात आरोपींनी विकासच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने विकास याचा मृत्यु झाला. दिघी पोलीसांनी तात्काळ तपास करीत तिनही आरोपींच्या ( Bopkhel Murder) मुसक्या आवळल्या.