Team My Pune City – मुंबई उच्च न्यायालयालाही बॉम्ब धमकीचा ईमेल (Mumbai High Court) मिळाल्याने आज (शुक्रवार) दुपारी मोठी खळबळ उडाली. दिल्ली उच्च न्यायालयाला सकाळी मिळालेल्या धमकीनंतर काही तासांतच मुंबईतही अशीच परिस्थिती निर्माण झाली. मिळालेल्या ईमेलमध्ये न्यायालय परिसरात स्फोटके ठेवण्यात आल्याचा दावा करत दुपारच्या नमाजानंतर स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला होता.
धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने उच्च न्यायालय परिसर (Mumbai High Court) रिकामा करून वकील, न्यायाधीश आणि उपस्थित नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. बॉम्ब शोधक पथके, डॉग स्क्वॉड आणि अग्निशमन दल घटनास्थळी तैनात करण्यात आले असून, परिसराची सखोल तपासणी सुरू आहे.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयालाही सकाळी अशाच प्रकारचा ईमेल मिळाला होता.
Maval : मावळ पर्यटन तालुका घोषित होणार
त्या ईमेलचा पत्ता “kanimozhi.thevidiya@outlook.com” असल्याचे समोर (Mumbai High Court) आले असून, त्यात २०१७ पासून पोलिस दलात घुसखोरी केल्याचा दावा आणि नमाजानंतर न्यायाधीशांच्या कक्षात स्फोट होईल, असा इशारा देण्यात आला होता.
गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि संस्थांना अशा स्वरूपाच्या बनावट ईमेलद्वारे धमक्या मिळत असून, मुख्यमंत्री सचिवालय आणि मौलाना आझाद मेडिकल कॉलेजलाही यापूर्वी अशा धमक्या आल्या होत्या. त्या सर्व खोट्या ठरल्या असल्या तरी, यावेळीही कोणतीही जोखीम न घेता तपास सुरू (Mumbai High Court) आहे.