विधातेवस्ती औंध येथे १०८ निरंकारी भक्तांचे रक्तदान
Team My pune city – आध्यात्मिकताच मानवी एकता ( Blood Donation Camp) मजबूत करू शकते आणि माणसांना एकमेकांच्या जवळ आणून परस्पर प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकते.त्याच हेतूने सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज एवं निरंकारी राजपिता जी यांच्या आशीर्वादाने पुणे झोन मधील संत निरंकारी सत्संग भवन, विधाते वस्ती औंध येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले होते.
ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन १०८ युनिट रक्त संकलन करण्यात आले. ससून रुग्णालय रक्तपेढीच्या टीम ने रक्त संकलन करण्यासाठी विशेष योगदान दिले.
Para Khelotsav : 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत हरियाणाच्या दीपक सैनीला सुवर्ण पदक
या शिबिराचे उदघाटन श्री.किशनलाल अडवाणी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या( Blood Donation Camp) संख्येने उपस्थित होते. संत निरंकारी मिशनद्वारे बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.
Talegaon Dabhade News : निवडणूक प्रक्रियेला गती; तळेगाव दाभाडे प्रभाग रचना मंजूर
संत निरंकारी मिशन द्वारा विधातेवस्ती औंध परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले( Blood Donation Camp) जाते.
यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशन चे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी विधातेवस्ती औंध परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश पोहोचविण्यात आला.आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार ब्रांच प्रमुख बिकबहाद्दूर बोगाटी यांनी ( Blood Donation Camp) व्यक्त केले.