Team My Pune City – शहरात बेकायदेशीर शस्त्रसाठ्यावर ( Bibwewadi Crime News) नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने मोहिमा राबविल्या जात असताना, विश्रामबाग पोलिसांनी एका 20 वर्षीय तरुणाला दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. जप्त केलेल्या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे 1 लाख 2 हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Kondhwa Crime News : कोंढव्यात हत्याराने तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्या तीन तरुणांना अटक
अटक केलेल्या आरोपीचे नाव मयूर सचिन भोसले (वय 20, रा. पापल वस्ती, गणपतीनगर, बिबवेवाडी, पुणे) असे असून, त्याच्याकडे अवैधरीत्या दोन पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस असल्याची गोपनीय माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या ( Bibwewadi Crime News) गुन्हे शाखेतील पोलिस शिपाई आशीष खरात आणि अनीस शेख यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून भोसले यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास विश्रामबाग पोलिस ठाण्यात ( Bibwewadi Crime News) सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (झोन 1) कृष्णिकेश रावळे, सहाय्यक पोलिस आयुक्त साईंनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर यांच्यासह पोलिस कर्मचारी सचिन कदम, गणेश काथे, शैलेश सुरवे, सचिन आहिवले, अमोल भोसेले, झाकीर मणियार, आशीष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, अनीस शेख, नितीन बाबर, सागर मोरे, शिवा गायकवाड आणि राहुल माळी यांनी ( Bibwewadi Crime News) सहभाग घेतला.


















