Team My Pune City – लोणी काळभोर परिसरातून ( Bibwewadi Crime News) चोरी गेलेली दुचाकी बिबवेवाडी परिसरात सापडताच पोलिसांनी एका वृद्ध चोरट्याला गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांना दुचाकीसह रिव्हॉल्वर, दहा जिवंत काडतुसे आणि तब्बल ३० चाव्यांचा संच जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ पाचच्या पोलिसांच्या दक्षतेमुळे उघड झाली आहे.
PMC : शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर, तरीही साडेचार कोटींची विनानिविदा पुस्तक खरेदी
अटक केलेल्या आरोपीचे नाव अरूण बाबुराव देशमुख (वय ६७, रा. श्रीनिवास सोसायटी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, बिबवेवाडी) असे आहे. लोणी काळभोर भागातून दि. १७ ऑक्टोबर रोजी एक दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद नोंदविण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पथक करत होते. तपासादरम्यान चोरटा चोरी केलेली दुचाकी घेऊन बिबवेवाडी परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुप्तपणे सापळा रचून देशमुख याला सुखसागरनगर परिसरातून ताब्यात ( Bibwewadi Crime News) घेतले.
Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
त्याच्याकडून चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पुढील चौकशी केली असता, त्याच्याकडे शस्त्रास्त्र असल्याची माहिती मिळाली. चौकशीत देशमुख याने स्वतःच्या घरात एका पिशवीत रिव्हॉल्वर आणि काडतुसे लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, त्या पिशवीतून एक रिव्हॉल्वर, दहा काडतुसे आणि ३० चाव्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांचा अंदाज आहे की, या चाव्यांचा वापर विविध वाहनांचे लॉक उघडण्यासाठी केला ( Bibwewadi Crime News) जात होता.
या संपूर्ण कारवाईत परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, सातपुते, शिरगरे, कुदळे, पाटील, माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांकडून देशमुखचा गुन्हेगारी इतिहास तपासला जात असून, त्याने पूर्वीही अशा चोरीच्या घटना केल्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत ( Bibwewadi Crime News) आहेत.


















