Team My Pune City – भूमी अभिलेख विभागातील( Bhumi Abhilekh Bharti 2025) गट क संवर्गातील भूकरमापकांच्या ९०३ रिक्त पदांसाठी तब्बल ३७ हजार १५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
Maharashtra Board : दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
राज्य शासनाने भूकरमापकांची ९०३ पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विभागातून ३ हजार ९०७, कोकण विभागातून ९ हजार ७९४, नाशिक विभागातून ५ हजार ३२७, छत्रपती संभाजीनगर विभागातून ९ हजार ९४२, अमरावती विभागातून ४ हजार ३४७ आणि नागपूर विभागातून ३ हजार ८३५ अर्ज प्राप्त झाले ( Bhumi Abhilekh Bharti 2025) आहेत. सध्या या अर्जांची छाननी सुरू आहे.
राज्यात भूकरमापक संवर्गातील एकूण १ हजार १६० पदे रिक्त असून त्यापैकी ९०३ पदे या भरती प्रक्रियेतून भरण्यात येणार आहेत. यामध्ये पुणे विभागातील ८३, कोकण विभागातील २५९, नाशिक विभागातील १२४, छत्रपती संभाजीनगर विभागातील २१०, अमरावती विभागातील ११७ आणि नागपूर विभागातील ११० पदांचा समावेश( Bhumi Abhilekh Bharti 2025) आहे.
या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे विभागनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी राज्य शासन जाहीर करणार आहे. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. अखेरीस विभागनिहाय अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाणार ( Bhumi Abhilekh Bharti 2025) आहे.


















