योग प्रात्यक्षिके करत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Team MyPuneCity –भारतीय जनता पार्टी, पतंजलि योग समिती पिंपरी-चिंचवड विभाग, आणि विलास मडिगेरी मा. सभापती, स्थायी समिती पिंपरी चिंचवड मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांसाठी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया येथे एमआयडीसी भोसरी सकाळी ५.३० ते ७:३० या वेळेत “आंतरराष्ट्रीय योग महोत्सव” साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी योग प्रात्यक्षिके करत योगाचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम जाणून घेत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Talegaon Dabhade : रूडसेट संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
योग प्रशिक्षक डॉ. नारायण हुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश साळुंखे, डॉ .वर्षा पारख, पांडुरंग चव्हाण, संगीता जाधव, शोभा जगताप, उत्तम काकडे,बाळकृष्ण राऊत यांनी उपस्थित नागरिकांकडून योग प्रात्यक्षिके करून केली. विविध योगासने आणि प्राणायाम करून घेताना त्यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली.



या प्रसंगी क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे पुणे चाप्टरचे कौन्सिल मेंबर संजीव शिंदे, जिल्ह्याचे संरक्षक सूर्या सोशल फाउंडेशनचे रमेश चौधरी, संत साई हायस्कूलचे संस्थापक प्रा. शिवलिंग ढवळे, शारदा क्लासेसचे प्रा. दिगंबर ढोकले आदी उपस्थित होते. श्री साई चौक मित्र मंडळ इंद्रायणीनगर व विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांचे कार्यकर्ते, तसेच भोसरी विभागातील योगशिक्षक साधक या योग महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. या शिबिरात २५० पेक्षाही जास्त योगसाधक उपस्थित होते.
प्रतिक्रिया…
प्रत्येकाच्या जिवनात शारीरिक आरोग्याला अतिशय महत्त्व आहे. शारीरिक आरोग्य निरोगी, दोषमुक्त आणि सुदृढ राखण्याकरिता योग आणि प्राणायाम ही महत्त्वाची गरज आहे. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच जिवनात तणावमुक्ती आणि मानसिक शांती देखील येते. प्रत्येकाला योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे शिबिर महत्वाचे ठरले.