situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bhosari: एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथे गणेश चतुर्थीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

Updated On:

Team My Pune City – एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, भोसरी (Bhosari) येथे गणेश चतुर्थीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या वर्षी गणरायाच्या सजावटीसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग फार मोठया प्रमाणात होता. सजावटीचे साहित्य विद्यार्थ्यांनी बनविले होते. टाकाऊ पासून टिकावू वस्तू बनविण्यात आले. यामध्ये विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. त्यांनी विविध प्रकारच्या माळा, वॉल हँगिंग, फळे, अष्टविनायक, गणेशाचे चित्र अतिशय सुबकतेने बनविले होते.

आठवावा शिवरायांचा इतिहास या कल्पनेतून विद्यार्थ्यांना शिवरायांचा जन्मोत्सव आणि राज्याभिषेक सोहळ्याचे प्रतीक म्हणून शिवनेरी व रायगड या किल्ल्याचे प्रतिकात्मक रूप विद्यार्थ्यांनी बनविले आणि तशी सजावट करण्यात आली. शिक्षकांच्या मार्गदशनाखाली गणरायाची सर्व सजावट करण्यात आली.या वेळेस विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा या हेतूने याचे आयोजन करण्यात आले होते.

Gauri Avahan: गौरी आवाहन स्थापनेसाठी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी ‘हे’ आहेत विशेष शुभमुहूर्त

Prakash Oswal: पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा-प्रकाश ओसवाल

सर्व शिक्षक व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात एकत्र जमले होते. सर्वप्रथम श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी व शिक्षकवृंदानी श्री गणेशाची आरती केली.शिक्षकांनी विध्यार्थ्यांना गणरायाच्या स्थापनेचे महत्व आणि त्याची पौराणिक कथा सांगितली. यावेळी पांडुरंग नाना गवळी, स्वप्नील गवळी, संकल्प गवळी, नितीन लोणारी, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, व इतर शिक्षकवृंद व विद्यार्थीगण उपस्थित होते.

ढोल व ताशांच्या गजरात श्री गणेशाची स्थापना गणेश वंदनेसह करण्यात आली.इयत्ता पाचवीच्या विद्यार्थी वर्गाने आपले लेझीम नृत्य सादर केले.

कार्यक्रमांमध्ये श्री गणेश चतुर्थीचे महत्त्व सांगण्यात आले. यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचे महत्त्व समजले.

Follow Us On