Team My Pune City – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या( Bhosari Crime News) हद्दीत घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.15) मध्यरात्री वाजता भोसरी येथील शांतीनगर वसाहत नंबर 4 च्या समोर पत्रा शेडमध्ये घडली.
Drugs : गांजा आणि शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
या प्रकरणात मयुर ज्ञानेश्वर गारूडकर ( 30, पोलीस शिपाई, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जय राजेश चौटालिया (19 दिघी रोड, भोसरी) याला अटक( Bhosari Crime News) केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जय चौटालिया याने 20 हजार रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल आणि 1 हजार रुपये किमतीची जिवंत काडतुसे बेकायदेशीररीत्या आणि विनापरवाना जवळ बाळगली होती. आरोपीवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी भोसरी पोलीस ( Bhosari Crime News) पुढील तपास करत आहेत.