Team MyPuneCity- मान्सून यंदा तब्बल १२ दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे मे महिन्यातच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या भीमाशंकर परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून यामुळे जीवनावश्यक वस्तूसह धान्य भिजल्य आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
भीमाशंकर परिसरात मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवरून येणारे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहे. रात्रीपासून असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. भीमा नदीवरील बंधाऱ्यांचे डाफे वेळेवर न उघडल्यामुळे पाणी अनेक गावांमध्ये शिरले आहे. घरात आणि शेतात पाणी शिरून मोठ नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची शेतातील घरे आणि जनावरांचे गोठेही पाण्याखाली गेले आहेत.
Pune: पुण्यात भारतीय प्राणी संशोधन संस्थेच्या हॅकाथॉन स्पर्धेत नवकल्पनांचा झंझावात; 110 तासांच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
भात खाचरांमध्ये पाणी साचल्याने भातासाठी तयार केलेली भात खाचरं पूर्णपणे नष्ट झाले आहे. पाण्याने खाचरं वाहून गेली आहेत. सध्या हवामान स्थिर असून, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.