Team My Pune City – काही महिन्यांपासून मेट्रो पुलाच्या ( Bhide Bridge) कामामुळे बंद असलेला भिडे पूल येत्या शनिवारपासून (11 ऑक्टोबर) वाहनचालकांसाठी खुला करण्यात येणार आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत या पुलावरील वाहतूक सुरळीत सुरू राहणार असून, रात्री दहानंतर मात्र मेट्रोच्या कामासाठी पूल वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
Rashi Bhavishya 9 Oct 2025 – कसा जाईल आपला आजचा दिवस?
गेल्या काही महिन्यांपासून भिडे पूल बंद असल्याने नारायण पेठेकडून डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या तसेच नदीपात्र रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या भागात दररोजची वाहतूक कोंडी वाढली होती, तर वाहनांना मोठा वळसा घालून डेक्कन जिमखान्याकडे पोहोचावे लागत होते. त्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांकडून पुल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी सातत्याने होत होती. सजग नागरिक मंचानेही या संदर्भात वाहतूक विभागाकडे ( Bhide Bridge) पाठपुरावा केला होता.
Kondhwa ATS Raid : कोंढव्यात मध्यरात्रीपासून एटीएस, पोलिस यंत्रणांची संयुक्त छापेमारी; इंडियन मुजाहिदीनशी संबंध असल्याची शक्यता
दिवाळीपूर्वी वाढणारी खरेदीची गर्दी आणि वाहनांचा ताण लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने अखेर पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रात्री दहानंतर मेट्रो पुलाच्या कामासाठी आवश्यक तेवढ्या वेळेसाठी भिडे पूल बंद राहणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात येणार ( Bhide Bridge) नाही.
या निर्णयामुळे नारायण पेठ, डेक्कन, शनिवार पेठ, तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती परिसरातील नागरिक व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भिडे पुलावरील वाहतूक पूर्ववत झाल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील गर्दी कमी होऊन दिवाळीपूर्व काळात प्रवास सुलभ होण्याची ( Bhide Bridge) अपेक्षा आहे.