Team My Pune City –भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवलेल्या मारुती इको गाडीने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवार (२१ ऑक्टोबर) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नांदे गावातील स्वामी समर्थ कट्टा व पशुखाद्य केंद्रासमोर, ढमाले वस्ती परिसरात घडली.
या प्रकरणात शहजाद अली असगर अली मन्सुरी (२८, बैगनवाडी, गोवंडी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी निखील गणेश कंधारे (२८, चांदे, मुळशी, पुणे) असून त्याला अद्याप अटक झालेली नाही.
Bavdhan Khurd:मल्टीनॅशनल IT कंपनीचे करोडोंचे फसवणूक प्रकरण उघड : ७५ अभियंत्यांना नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची लूट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ मोहम्मद हुसेन हा आपल्या मित्र सोनूसह हिरो पॅशन प्रो मोटारसायकलवरून जात असताना समोरून येणाऱ्या मारुती इको (क्रमांक MH14 LA9399) गाडीने विरुद्ध दिशेने वेगात येत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत मोहम्मद हुसेन याच्या डोक्यास व पायांना गंभीर दुखापत झाली तसेच सोनू देखील जखमी झाला. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. बावधन पोलीस आरोपीचा शोध घेत तपास करीत आहेत.


















