Team My Pune City –गेल्या काही दिवसापासून अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र पाहायला मिळत आहे. आज बारामतीत शरद पवार आणि अजित पवार हे विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या वार्षिक सभेला आले होते. यावेळी अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठानमधील विकास कामांची पाहणी केली.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Baramati)बारामतीत पुन्हा एकत्र आले होते. बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मधील व्हीआयटीमध्ये सर्वसाधारण सभा पार पडली आहे. या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून शरद पवार ,विश्वस्त म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार,खजिनदार म्हणून युगेंद्र पवार उपस्थित होते. या सभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये संस्थेच्या कार्यालयात बैठक देखील झाली आहे.
Ajit Pawar: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार-अजित पवार
Maval: मावळचे भजनसम्राट ह.भ.प. नंदकुमार शेटे महाराज यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मान
या आधी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीला उपस्थित राहिले होते.त्यानंतर आज परत एकदा एकत्र आले होते.